Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आयपीएलमध्ये नवीन नियम ; अकरा खेळाडूंऐवजी बारा खेळणार; काय आहे हा नियम? कसा लागू होणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

आयपीएलमध्ये नवीन नियम ; अकरा खेळाडूंऐवजी बारा खेळणार; काय आहे हा नियम? कसा लागू होणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

mahalokwaniBy mahalokwaniMarch 27, 2023Updated:March 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

IPL Rules 2023 : IPL 2023 च्या 16 व्या सीजनला आता आठवड्याभराचा अवधी उरला आहे. दरवर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठा उत्साह असतो. या सीजनमध्ये ‘होम-अवे’ फॉर्मेट असणार आहे. म्हणजे यंदा सर्वच टीम आपलं होम ग्राऊंड आणि दुसऱ्या टीम्सच्या मैदानावर खेळणार आहेत. कोरोनाव्हायरसमुळे मागची तीन वर्ष ठराविक ग्राऊंडसवरच सामने झाले. यंदाच्या आयपीएलच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नियम. यंदाच्या आयपीएलमध्ये तुम्हाला नवीन नियम दिसतील. 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. तेव्हापासून हे नियम लागू होतील.

आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्या आणि चेन्नईचा कॅप्टन एमएस धोनी मैदानात उतरतील. यंदाच्या सीजनमध्ये कुठले नवीन नियम असणार त्या बद्दल जाणून घ्या.

✦ प्लेइंग इलेव्हनची घोषणा

सर्वात क्रांतीकारी बदल प्लेइंग इलेव्हनच्या घोषणे संदर्भात आहे. आतापर्यंत कॅप्टन टॉसच्यावेळी प्लेइंग इलेव्हनची माहिती द्यायचे. पण आता काही बदल झालेत. आता कॅप्टन टॉसच्यावेळी दोन प्लेइंग इलेव्हन ठेऊ शकतो. प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना कॅप्टनकडे दोनपैकी एक प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा पर्याय असेल. टॉसचा परिणाम कमी करण्यासाठी हा नियम बनवण्यात आलाय. फक्त टॉस जिंकणाऱ्या टीमला फायदा होऊ नये, हा त्यामागे उद्देश आहे.

✦ इम्पॅक्ट प्लेयर

संघ मैदानात 11 खेळाडू घेऊन उतरतील. त्याचबरोबर 4 सब्स्टिट्युट खेळाडूंची नावं नाणेफेकीवेळी सांगावी लागतील. इम्पॅक्ट प्लेयर या चार जणांमधून एक इम्पॅक्ट प्लेयर निवडावा लागणार आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर सामन्याच्या सुरुवातीपासून करता येईल. टीम, वाटल्यास शेवटच्या काही ओव्हरसाठी त्याचा वापर करू शकते. विकेट पडल्यानंतर किंवा बॅटर रिटारर्ड हर्ट झाला की खेळाडू मैदानात उतरू शकतो.

पण विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर गोलंदाजी असणाऱ्या संघाने इम्पॅक्ट प्लेयर आणाला तर तो आधीचं षटक पूर्ण करू शकणार नाही. त्याला पुढच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

AFVT.

✦ अजून कुठले नवीन नियम आहेत?

WPL प्रमाणे आयपीएलमध्येही खेळाडूंना नोबॉल आणि वाइड बॉलवर DRS घेण्याचा पर्याय असेल. WPL मध्ये पहिल्यांदा या नियमाचा प्रयोग करण्यात आला. या नियमांमुळे अंपायरच्या चूका अजून कमी होतील.

टीम्सनी निर्धारित वेळेत आपल्या ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला नाही, तर उर्वरित ओव्हर्ससाठी 30 यार्ड बाहेर फक्त 4 फिल्डर्स ठेवता येतील. विकेटकीपर किंवा फिल्डरने आपल्या पोजिशनमध्ये उगाचच बदल केला, तर त्याला चुकीच मानून फलंदाजी करणाऱ्या टीमला 5 रन्स बहाल केले जातील. त्याशिवाय तो चेंडू डेड बॉल ठरवला जाईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleForm-16 चा वापर करुन कसं फाइल करायचं Income Tax रिटर्न?; वाचा एकदम सोप्या पद्धतीने…
Next Article भारतीय क्रिकेट संघातील या क्रिकेटपटूचे वडील होते बेपत्ता; सापडले या ठिकाणी.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.