जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरातील श्रीराम मंदिर येथे श्रीरामरक्षा स्तोत्र मराठी भावानुवाद या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प.विजयकुमार बागडे सर, यांच्या शुभहस्ते तसेच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष उद्धवराव देशमुख रमेश चांदेकर सर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष : उध्दव बापू देशमुख ,शुभहस्ते : ह.भ.प.विजयकुमार बागडे सर
श्री रमेश एकनाथ चांदेकर सर भावानुवादक सदानंद बाळकृष्ण होशिंग यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया सांगताना श्रीरामरक्षा या स्तोत्राची निर्मिती कशी झाली यावर सुंदर विवेचन केले. आणि यातूनच या संस्कृत स्तोत्राचा मराठी भावानुवाद करुन श्रीरामसेवेचे महत्व विषद केले.
यावेळी उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, शशिकांत देशमुख, राजेश मोरे, ॲड.रमेश काळे, अभय किंबहुणे, योगेश देशमुख, विवेक देशमुख, रमेश अडसूळ, बी ए पारखे, डॉ सुनील कटारिया, सौ जयश्रीताई देशमुख, जयेश होशिंग, श्रीमती संगीताताई देशमुख, संतोष देशमुख, विशाल पोले , सौ मीना होशिंग,सौ साधना होशिंग, सौ मोहिनी देशमुख , सौ दर्शना होशिंग सौ केतकी देशमुख श्रीराम मंदिर भजनी मंडळ महिला तसेच भाविक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत होशिंग यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन अनिलकुमार देडे सर यांनी केले.
