जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
कर्जत-जामखेड : पायाला मार लागून अपघातात गंभीर झालेल्या कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या रूग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या रुग्णाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.

कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील चैतन्य बाबासाहेब बिटके या 15 वर्षीय मुलाचा पाडव्याच्या आदल्या दिवशी मोटारसायकल अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

सदर रूग्णावर पुण्यातील संचेती हाॅस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. पायावरील शस्त्रक्रियेसाठी लाखो रूपयांचा खर्च येणार होता.बिटके यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न चैतन्यच्या आई वडिलांसमोर उभा ठाकला होता.

बिटके परिवारावर अचानक ओढवलेल्या या संकटाची माहिती माजी सरपंच दादासाहेब बिटके यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना कळवली होत

