सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा-भजन,रामकथा,दररोज रात्री कीर्तन ,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.उद्या (ता.३)रोजी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
त्यानंतर दुपारी १२वाजता संत वामनभाऊ यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याचे महंत विठ्ठल महाराज यांनी सांगितले आहे

दरम्यान आज गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन ,तसेच भगव्या पताका घेऊन पुरुष लहान मुले सहभागी झाले होते. गावातून बँड, टाळ,मृदुगाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. सप्ताहाच्या कार्यक्रमात अनेक साधू संत ,राजकीय नेते यांनी भेट दिली.
नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे ,शेवंगाव-पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी काल भेट दिली.
दरम्यान आज करुणा मुंढे यांनी या कार्यक्रमास भेट दिली,व दर्शन घेतले. उद्याच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत
चिंचपूर पांगुळ-मानेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराज अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थ यांनी भाविक भक्तांना उद्याच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(छाया-सोमराज बडे)
