Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गजराजनगरला हनुमान जन्मोत्सवाची किर्तनाने सांगता.!

गजराजनगरला हनुमान जन्मोत्सवाची किर्तनाने सांगता.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 8, 2023Updated:April 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जय हनुमान उर्जा आणि शक्तीचे प्रतिक-हभप इंगळे महाराज

नगर – भगवान हनुमान शिवाचा अवतार मानले जाणारे असून स्वत: जय हनुमान हे उर्जा आणि शक्तीचे प्रतिक मानले जातात. ते रामाचे निस्सीम भक्त होते, त्यामुळे शक्तीची देवता म्हणून देखील जय हनुमान ओळखले जातात. त्यांची मनोभावनेने पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात सुख,समृद्धी नांदते आणि सर्व संकटे, दु:ख दूर होतात, असे हभप परमेश्वर इंगळे महाराज यांनी आपल्या सुश्राव्य किर्तनातून सांगितले.


नगर-औरंगाबाद रोडवरील गजराजनगर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे गावातील तरुणांनी कावडीने आणलेल्या जलाने श्री हनुमान मुर्तीस जलाभिषेक करण्यात आला. सुर्योदयाच्या सुमारास फुले, गुलाल उधळून ‘बजरंग बली कि जय’ चा नाम घोष करीत जन्मसोहळा साजरा करण्यात आला. रात्री जन्मोत्सवाच्या किर्तनाने सांगता झाली. यावेळी शिवराजे मित्र मंडळ, सुर्यपूत्र प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते, सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.


हभप इंगळे महाराज म्हणाले, की चैत्र महिन्यात रामनवमी उत्सवानंतर हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र देशभर साजरा होतो. ज्यांच्या मनात आहे श्रीराम, त्यांच्या तनात आहे श्रीराम. संपूर्ण विश्वात जो आहे बलवान, असा माझा प्रिय हनुमान, सूर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्यांच्या शक्तीपुढे सर्व काही लहान, अशा या हनुमंतरायाची मोठी ख्याती विश्वात आहे. त्यांची आराधना करा, असे महाराजांनी आपल्या किर्तनातून भक्तांना आवाहन केले.
या जन्मोत्सव सोहळ्यासाठी हभप शिवाजी पठारे, हभप दत्तात्रय शिंदे, दत्ता बोराडे, हेमंत पटेल, माणिक देवकर, सुनिल जरे, राकेश शिनगारे, रमेश आंबेकर, व शिवराजे मित्र मंडळ, सूर्यपुत्र प्रतिष्ठानच्या तरुणांनी परिश्रम घेतले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDaund- दौंड | खानवटे तालुक्यात दिवसाढवळ्या दरोडा; जवळच्याच व्यक्तीवर संशय.!
Next Article iPhone 15 मध्ये हटके फिचर्स; या तारखेला होणार लाँचिंग.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.