जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
भुतवडा गावचे भुमिपुत्र आबासाहेब डोके यांची पिंपरी चिंचवड येथे पोलिस म्हणून व आस्तिक डोके यांची नांदेड पोलिस म्हणून तसेच साकत गावचे भाचे नगर येथे पोलिस म्हणून कार्यरत असणारे महादेव जाधव यांची निवड झाल्याबद्दल आज रोजी जामखेड तालुक्यातील साकत येथे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अत्यंत गरीब परिस्थितीतून या सर्वांनी पोलीस भरतीची सराव अखंड चालू ठेवला होता यामधील आबासाहेब डोके याची परिस्थिती अत्यंत हालकीची असताना , फक्त आईच्या जिद्दीपोटी या मुलाने या अगोदर पण शासकीय सेवेत एक पोस्ट काढली होती पण त्याला महाराष्ट्र पोलीस ही वर्दी आपल्या अंगावर घालायची होती त्याने पहिली नौकरी सोडून दिली आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने पोलीस भरतीचा सराव करू लागला व त्याने यामध्ये यश प्राप्त केले.

तसेच आस्तिक डोके हा तर काही दिवस नगर येथे राहून पोलीस भरतीची तयारी करत होता पण घरची परिस्थिती हालाकेची होती त्यामुळे तो जास्त दिवस नगर शहराच्या ठिकाणी राहणे त्याला परवडणारे नव्हते त्यामुळे त्याने आपण आपल्या तालुक्यातच म्हणजेच जामखेड मधेच पोलीस भरतीची तयारी करणार असे मनाशी ठाम गाठ बांधली व जामखेड येथेच राहून तसेच घरचे कामे पाहून वडिलांना शेती कामात हातभार लावून तो पोलीस भरतीची तयारी करत राहिला व त्यानेही वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले या दोघांचेही मित्र त्यांच्या डोळ्यासमोर विविध खात्यात भरती होत होते त्यांनाही वाटत होते की आपण एक दिवस आपल्या मित्र सारखेच शासकीय सेवेत जावे व त्यांनी ते करून दाखवले.
भुतवडा गावातील ग्रामस्थांनी सुद्धा या दोन सुपुत्रांचा यथोचित सन्मान केला तसेच विविध ठिकाणी त्यांच्या निवडीचे बॅनर लावले कारण की या गावांमध्ये यांचा आदर्श पाहून बाकीची तरुण पिढी ही शासकीय सेवेत किंवा देश सेवेसाठी तयार व्हावी हा यामागचा उद्देश होता. यावेळी या दोघांनी पण सांगितले की जे सराव करतात त्यांना आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करू व जास्तीत जास्त आमच्या गावातील मुले देश सेवेत कसे जातील या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करू

प्रतिक्रिया:- मा. सभापती भगवान मुरूमकर
भुतवडा गावातील या दोन सुपुत्रांनी एक तरुण पिढीला संदेश दिला आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर संयम खूप महत्त्वाचा असतो. या दोघांना यश मिळाले संपूर्ण जामखेड तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे, पण जामखेड तालुक्यातील जे युवक स्पर्धा परीक्षेचे तयारी करतात त्यांनी संयमीने व जिद्द चिकाटीन ठेवावी व आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून सराव करावा यश नक्की मिळेल या दोघांचा सन्मान करण्यामागचा हेतू एवढाच आहे की या दोघांचा आदर्श जामखेड तालुक्यातील तरुण पिढीने घेणे व आपणही एक दिवस देश सेवेसाठी सज्ज होऊ यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने केला आहे.
याप्रसंगी माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर, साकत सोसायटीचे संचालक विनोद मुरुमकर , बाजीराव वराट, महेश बहीर , नागराज मुरुमकर ,प्रतिक मुरुमकर , हनुमंत वराट आदी उपस्थित होते.
