टोयोटा कंपनीच्या दोन कार्सना बाजारात तुफान मागणी आहे. या तगड्या मागणीमुळे कंपनीने दोन्ही कार्ससाठी बुकिंग्स घेणं थांबवलं आहे. (PC : Toyota Bharat

टोयोटा आणि सुझुकी या दोन कंपन्यांनी एकत्र येत हायब्रिड मॉडेल्स विकसित करून लाँच केले. या मॉडेल्सना भारतीय वाहन बाजारात तगडी डिमांड आहे. (PC : Toyota Bharat)

या दोन्ही कार्सचं दमदार मायलेज हे तुफान मागणीचं प्रमुख कारण आहे. (PC : Toyota Bharat)

टोयोटा हायरायडर कारचं मायलेज २७.९७ किमी प्रति लीटर इतकं आहे, तर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही कार २१.१ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. (PC : Toyota Bharat)

तगड्या मायलेजमुळे ग्राहक या कार्सच्या हायब्रिड मॉडेल्सना प्राधान्य देत आहेत. (PC : Toyota Bharat)

टोयोटा हायक्रॉस ZX (O) कारवरील वेटिंग पीरियड २.५ वर्षांवर पोहोचला आहे तर हायक्रॉस VX या व्हेरिएंटवरील वेटिंग पीरियड ८ ते १२ महिन्यांवर पोहोचला आहे

कंपनीने त्यांच्या डीलर्सनादेखील सांगितलं आहे की, या दोन कार्ससाठी सध्या बुकिंग्स घेऊ नका. (PC : Toyota Bharat)