पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
दौंड भीमा नदी पत्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा; वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या डोळ्यावर बांधली पैशाची पट्टी बांधली आहे का अशी शंका उपस्थित होते, येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ दौंड तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे राजेगाव आणि कर्जत तालुक्यातील खेडे येथील भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे .

हा वाळू उपसा गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे नदीपात्रातील स्थानिकच्या मते तांत्रिक बोटीने मच्छीचे जाळे फाटली जात आहे , त्यामुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आली आहे वाळू तस्करांमुळे आलेली आहे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे या तस्करांचे आता चांगलेच पावले आहे असे असले तरी या काळ्या पैशांच्या कमाईन निसर्गाची देखील मोठी हानी होत आहे.

त्यामुळे गाव पातळीवरील सर्व रस्ते डबघाईला आली आहेत रात्रीच्या वेळी चोरटा उपसा करून गावातूनच वाळू भरलेली वाहने बाहेर काढली जात आहेत गावातील व बाहेरच्या मंडळींकडून संगमताने त होत असलेल्या वाळूचा उपसा सर्वांच्या पथ्यावर पडला आहे. सध्या येथील पात्रात सुमारे दहा ते पंधरा यांत्रिक बोटीवरून कर्जत तालुक्यातील तालुक्याच्या हद्दीतील वाळू उपसा करून दौंड तालुक्यात वाहून आण ला जात आहे
हा दिवसाढवळ्या चालणारा व्यवसाय सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना दिसत आहे मात्र डोळ्यावर पैशांची पट्टी असल्याने ते सतत डोळे झाक करताना दिसत आहे या वाळू चोरीची तक्रार नागरिकांनी वारंवार तक्रार केली आहे. पण कारवाईक झालीच नाही
दौंड च्या पूर्व भागात वीट भट्टीसाठी ही फार मोठ्या प्रमाणात मातीची ही चोरी होत आहे तलाठी व मंडलाधिकारी मालामाल झाले आहेत अशी पूर्व भागात जोरदार चर्चा चालू आहे त्यामुळे महसूल विभागाचे हात नेमके कोणी बांधले आहेत त्यामुळे महसूल विभागाविषयी उलट सुलट चर्चा नागरिक करत आहेत दोन ते तहसीलदार संजय पाटील यांचे संपर्क साधला असता त्यांनी फोन उचललेला नाही
