Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकीचा फोन; उडवून टाकण्याचा इशारा.!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकीचा फोन; उडवून टाकण्याचा इशारा.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 11, 2023Updated:April 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र सुरुच आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. त्यांना उडवून टाकण्याची धमकी देणार फोन  मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी लागलीच फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. त्यावेळी हा फोन पुणे शहरातून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी देणारा फोन आला आहे. हा फोन मुंबई पोलिसांच्या ११२ क्रमांकावर आला आहे. फोन करणाऱ्याने फक्त मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकणार असल्याचे म्हणत फोन कट केला.

पोलीस यंत्रणा अलर्ट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी त्वरीत फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. यावेळी फोन पुणे येथील वारजे येथून आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांना त्वरित तपास करण्याचे आदेश दिले.

अंबानी, अमिताभ बच्चन यांनाही धमकी

निनावी फोन करुन धमक्या देण्याचे सत्र वाढले आहे. राजकीय नेते, उद्योपती यांचा नावांचा वापर करत धमक्या दिल्या जात आहेत. यापूर्वी नागपूर पोलिसांना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याचा फोन आला होता. अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांचा अँटालिया बंगला उडवून देण्याची धमकी दिली आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगलेही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन आल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. यामुळे निनावी फोन पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहाराष्ट्र राजकारणात भूकंप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द.!
Next Article जामखेडमध्ये भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात संपन्न; गायक मिलिंदजी शिंदे यांच्या भिमगितांने जिंकली जामखेडकरांची मने.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.