Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed Breaking| जामखेड पिपल्स एज्युकेशन सोसायटीत आर्थिक घोटाळा; बरखास्त संचालक मंडळावर गुन्हे दाखल होणार.!

Jamkhed Breaking| जामखेड पिपल्स एज्युकेशन सोसायटीत आर्थिक घोटाळा; बरखास्त संचालक मंडळावर गुन्हे दाखल होणार.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 12, 2023Updated:April 12, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

अहमदनगर – जामखेड (Jamkhed) तालूक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थेचा कारभार गेली विस वर्ष बोगस संचालक मंडळ करत असून . 2001 नंतर एक ही बदल अर्ज मंजूर नसताना हे संचालक मंडळ कार्यरत आहे . 2001 नंतर एकदाही धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही व अनेकदा नोटीस काढून ही सध्याचे कारभारी एकही कागद पत्री पुरावा सादर शकले नाही . धक्कादायक म्हणजे संस्था कार्यालयात कोणते ही अधिकृत दप्तर नाही .

कोणताही वार्षिक ताळेबंद संस्थेने आज पर्यंत सादर केले नाहीत त्यामुळे विस वर्ष हे संचालक मंडळ कोणत्या अधिकाराने काम करत होते व त्यांनी किती आर्थिक गैरव्यवहार केला याचा तपास आर्थिक गुन्हे शाखे ने करावा व संबंधिता वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदना द्वारे पोलीस उप अधीक्षक गुन्हेशाखा यांच्या कडे विलास साठे पाटील यांनी केली आहे .


विलास साठे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात या शिक्षण संस्थेचे 2001 पासून चे बदल अर्ज दाखल होते . संस्थेचे तत्कालीन सचिव दिलीप बाफना यांनी अतिशय चांगला कारभार केला पण त्यांना मनमानी पद्धतीने पदावरून दूर केले होते . त्यांनी सदर बदल अर्जास हरकत घेतली होती . अनेकदा संधी देऊन सध्याचे बोगस संचालक कागदपत्रे दाखल करू शकले नाही .

त्यांच्याकडे कसलाच पुरावा नाही व धर्मदाय उपायुक्त अहमदनगर यांनी दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सर्व बदल अर्ज रद्द ठरवले त्यामुळे आपोआपच संस्थेला संचालक मंडळ राहिले नाही तरी अध्यक्ष , उपाध्यक्ष व सचिव आपल्या सहीने बँकेचे व्यवहार करत आहेत . या संस्थेचे सचिव साधे सदस्य सुद्धा नाहीत तरी नोकर भरतीचे प्रस्ताव पाठवत आहेत त्याला सह सचालक उच्चशिक्षण यांनी स्थगिती दिली आहे . परंतु तरीही नोकरी च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरूच आहेत . नुकतेच दोन अनुकंपा प्रस्ताव मंजूर करण्यात आले हे गरजेचे असले तरी या बाबत आर्थिक व्यवहार होत आहेत तसेच या नोकऱ्या पुढे अडचणीत येणार आहेत .तसेच या संस्थेचे ज्या बँकमध्ये खाते आहेत अशा बँकांचीही चौकशी करण्यात येणार आहे, सर्व बँकांनी पदाधिकाऱ्यांच्या सहीने व्यवहार झालेत त्याची पण चौकशी होणार आहे, व या काळात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती मागितली आहे .

त्या नंतर आपण स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याची माहिती साठे यांनी दिली . फक्त तीनच पदाधिकारी कारभार पहात आहेत . परतू त्यांच्या मुळे इतर जुन्या सर्व संचालकान वर पण गुन्हे दाखल होणार आहेत . याबाबत च्या कारवाईल दिलीप बाफना यांनी धर्मदाय आयुक्त यांच्या कडे हरकत घेतल्याने हे सर्व बदल अर्ज रद्द झाले आहेत व सध्या काम पहाणाऱ्या पदाधिकारी यांनी केलेल्या अर्जाला दिलीप बाफना , उल्हास पवार यांनी हरकत घेतली आहे. आता हे प्रकरण न्याय प्रविष्ठ झाले आहे .व या शिक्षण संस्थेला कोणीही अधिकृत पदाधिकारी नाही या बाबत कोणा ची फसवणूक होऊ नये . म्हणून तक्रार दिली असल्याचे समजते . प्राध्यापक व शिक्षक भरतीच्या नावाखाली एका पतसंस्था कार्यालयात व सुवर्णं पेढीतून अनेक व्यवहार झाल्याची चर्चा शहरात होत असते .

लवकरच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या हलचाली पोलीस प्रशासनाने सुरु केल्या आहेत . असे समजते ही तक्रार दाखल करून हे प्रकरण ई. डी. कडे पाठवून या सर्व संचालकांच्या मालमत्ते ची चौकशी करण्या साठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री .साठे यांनी सांगितले .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसंत भगवानबाबा यांचा ८९वा अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची झाली सांगता.धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,भगवान गड यांच्यातील दुरावा संपला.!
Next Article जि.प.प्रा.शाळा तपनेश्वर , जामखेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.