Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ahmednagar Kusti : शिवराज जखमी, महेंद्र गायकवाड ठरला; छत्रपती शिवराय केसरी कुस्तीचा मानकरी

Ahmednagar Kusti : शिवराज जखमी, महेंद्र गायकवाड ठरला; छत्रपती शिवराय केसरी कुस्तीचा मानकरी

mahalokwaniBy mahalokwaniApril 24, 2023Updated:April 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर येथील छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम निकाली कुस्तीत महेंद्र गायकवाडने सोन्याची गदा पटकावण्याचा मान मिळवला आहे. कुस्ती सुरू झाल्यापासूनच खिलाडी वृत्ती दाखवत सोलापूरचा महेंद्र गायकवाड याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर कब्जा मिळवत होता. दोन्ही दिग्गज मल्लांमध्ये जवळपास 10 मिनिटे ही निकाली कुस्ती सुरू होती. या 10 मिनिटांमध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात चांगलीच धरपकड सुरू होती. अखेर महेंद्रच्या मजबूत पकडीनंतर अचानक शिवराजला त्रास झाल्याने जखमी झाला. शिवराजला गंभीर त्रास होत असल्याचं समजताच त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर आयोजकांकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विजयी घोषित केले.

ही अंतिम निकाली कुस्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लावण्यात आली. छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा 21 ते 23 एप्रिलदरम्यान अहमदनगरच्या वडियापार्क मैदानात पार पडली. जवळपास बाराशे मल्ल या कुस्ती स्पर्धेसाठी हजर झाले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी 2023 चा विजेता शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक, महेंद्र गायकवाड आशा दिग्गज मल्लानी सहभाग घेतला होता

.

ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवराय केसरीच्या विजेत्यास अर्धा किलोची सोन्याची गदा म्हणजेच जवळपास 35 लाख रुपये किमतीचे बक्षीस देण्यात आले.

अहमदनगरच्या वडियापार्क येथे झालेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राम शिंदे, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी दिलीप सातपुते, अनिल शिंदे, संग्राम शेळके, वैभव लांडगे, काका पवार, प्रशांत लहारे, जिल्हा तालीम संघ उपाध्यक्ष अभिषेक भगत आदी उपस्थित होते. परंतु यावेळी भाजपनेते शिवाजी कर्डीले उपस्थित नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरात महात्मा बसवेश्वर यांची ८९२ वी जयंती उत्साहात साजरी.!
Next Article अहमदनगर | आंबेडकरी चळवळीचा भव्य मोर्चा धडकणार पोलीस अधीक्षक कार्यालयावर; या प्रमुख मागण्यांसाठी.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.