अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे, शुक्रवार ६ जानेवारीच्या पत्रकार दिनानिमित्त शहरातील चार पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व एक वर्षाचे विमा कवच असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कार योजनेची जिल्हाधिकारी यांनी तोंडभरुन प्रशंसा केली.
गौतमी पाटीलने भर स्टेजवर नाचताना एका मुलाला केलं किस; व्हिडिओ होतोय व्हायरल !
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रभारी माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, पुरस्कारांचे प्रायोजक मतदारचे संपादक एड. दिलीप एडतकर, हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, जनमाध्यमचे अभीराम देशपांडे व प्रतिदिन-वृत्त केसरीचे प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शशांक लावरे यांना प्रतिदिन-वृत्तकेसरी पुरस्कृत लक्षवेधी, वैभव चिंचाळकर यांना हिंदुस्थान पुरस्कृत बाळासाहेब व डॉ. अरुण मराठे प्रभावी, महेश कथलकर यांना विदर्भ मतदार पुरस्कृत ममता एडतकर उत्कृष्ट तर गजानन मोहोड यांना जनमाध्यम पुरस्कृत अनिल कुचे शोध पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला.
Chitra Wagh: चित्रा वाघ यांचा गेम त्यांच्यावरच उलटला; राज्य महिला आयोगाने दिली नोटीस !
जिल्हाधिकारी पवनीत कौर यावेळी म्हणाल्या, पत्रकारांवर महत्त्वाची जबाबदारी असून त्यांना नेहमी सामाजिक जाणीवेने काम करत जनजागृती करावी लागते. प्रशासनालाही त्यांच्या माध्यमातूनच कामाची दिशा कळते. पुढे बोलताना विद्यार्थीदशेत वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपणास शिक्षणही मिळाले, याचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत असतानाही वृत्तपत्रातील माहितीचा मला खूप फायदा झाला, हेही स्पष्ट केले. आयोजनाचे तोंडभरुन कौतुक करतानाच पत्रकारांचे कामकाज कसे खडतर व जोखीमीचे आहे, याची आपणास जाणीव असल्याचे स्पष्ट करीत त्यांना यथायोग्य सहकार्य करण्याचे अभीवचन दिले. पत्रकारितेचे विश्व हे सर्वांसाठीच लाभदायक आहे, या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना ‘पत्रकार दिना’च्या शुभेच्छा देण्यासही त्या विसरल्या नाहीत.
