Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Chitra Wagh: चित्रा वाघ यांचा गेम त्यांच्यावरच उलटला; राज्य महिला आयोगाने दिली नोटीस !

Chitra Wagh: चित्रा वाघ यांचा गेम त्यांच्यावरच उलटला; राज्य महिला आयोगाने दिली नोटीस !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद सुरू आहे. उर्फी जावेदचा नंगा नाच महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. यामुळे या वादाला सुरूवात झाली होती. काल पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी या प्रकरणात राज्य महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असून रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप केले होते.

या संबंधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा (Chitra Wagh) वाघ यांना महिला आयोगाकडून नोटीस पाटवत असल्याचे सांगितले आहे.

माझा घात घडवला जाऊ शकतो – सुषमा अंधारे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

याबाबत अधिक माहिती अशी की, चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खुलासा केला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “चित्रा वाघ यांनी काल अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. मात्र ही नोटीस अनुराधा मालिकेचे दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवण्यात आली होती. याबद्दल त्यांनी खुलासेही केले होते. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची अप्रतिष्ठा केली आहे. आयोगाबद्दल अविश्वास निर्माण होईल असे वक्तव्य त्यांनी केले आहे.”

“त्यामुळेच आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी राज्य महिला आयोग चित्रा वाघ यांना नोटीस पाठवत आहे, यावर दोन दिवसांत खुलासा करावा दोन दिवसांत खुलासा केला नाही तर कोणतेही म्हणणे नाही म्हणून महिला आयोग एकतर्फी कारवाई करेल,” असा ईशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली…

त्याचबरोबर चित्रा वाघ संजय राठोड प्रकरणात तोंडावर पडल्या, रघुनाथ कुचिक प्रकरणात तोंडावर पडल्या. पोलिसांना भेटायला गेल्या मात्र पोलिसांनीही त्यांच्या बालिशपणाची दखल घेतली नाही. गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असूनही दखल घेतली जात नाही, हा त्यांचा बालीशपणा आहे, अशी टीकाही रुपाली चाकणकर यांनी केली आहे. भाकरीच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रश्न विचारतोय आणि तुम्ही कपड्यांवर बोलत आहात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशिवडी कोर्टाने काढला संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी,
Next Article धक्कादायक! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या भावाने जागीच संपवलं
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.