जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी जुनी पेन्शन साठी संपामध्ये सहभागी झालेल्या सहावा दिवस आहे. यावेळी अध्यक्ष एकनाथ (दादा) चव्हाण होते, प्रमुख उपस्थिती विस्तार अधिकारी संघटना राज्याध्यक्ष संतोष ठोंबरे , गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, डॉक्टर संजय भोरे ,नागेश शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक यादव, कृती समिती अध्यक्ष युवराज ढेरे पाटील, सचिव ज्ञानेश्वर कोळेकर, संतोष राऊत सर ,मुकुंदराज सातपुते, नारायण राऊत, प्राचार्य सोमनाथ उगले, पांडुरंग मोहोळकर,तुळशीराम भोजने, दशरथ कोपनर ,संतोष डमाळे, जाकीर शेख व सर्व संपात सहभागी कर्मचारी उपस्थित होते. विस्तार अधिकारी संघटना राज्याध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी मनोगतामध्ये अभी नही…
Author: mahalokwani
नगरशहर- अहमदनगर शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील निर्मलनगर येथील गाडेकर चौक येथील रहिवाशी यांनी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांना फोन करून सांगितले की, एक मनोरुग्न महिला असून ती माझी दोन महिन्यात महिन्यापासून या विभागात वास्तव्य करीत आहे तिला अद्याप पर्यंत कोणीही घ्यायला किंवा विचारण्यास आले नाहीत त्या कॉलनीतील सर्व नागरिक त्या महिलेला जेवायला व जीवनावश्यक वस्तू देत होते. परंतु सदर महिला हुशार होती परंतु काही मानसिक तणावातून ती मनोरुग्ण झाली आहे असे समजल्यानंतर तेथील सुज्ञ नागरिकांनी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांना संपर्क साधला व सदर मनोरुग्न महिलेसाठी आपणाला काय करता येईल किंवा तिला काय मदत करता येईल असे विचारले असता त्यांनी त्यांनी…
जर तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्ही ते अद्याप आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयकर विभागाने income Tax पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत अनेक वेळा वाढवली आहे. ज्यांनी अद्याप आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, अशा सर्वांसाठी आयकर विभागाने ट्विटरवर एक इशारा जारी केला आहे. PAN आणि आधार 31 मार्च 2023 पर्यंत लिंक केले जाऊ शकतात. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने असा निर्णय दिला आहे की जर पॅन कार्ड धारक मार्च 2023 पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकले नाहीत तर मार्च 2023 नंतर pan खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड निष्क्रिय होईल. ज्यांनी 31…
“पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया” ही स्लोगन तुम्ही ऐकलीच असेल. तर मित्रांनो यामध्ये एक उदाहरण देण्यात आलेला आहे जर आपली मुलं शिकली तरच प्रगती होणार आहे. आणि मित्रांनो सध्या( RTE) राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना मोफत इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आजच सुवर्णसंधी आणि शेवटची संधी सुद्धा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची 25 मार्च 2023 मुदतवाढ देण्यात आले आहे मित्रांनो शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गांना समान असावा आणि यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार अर्थातच आपण त्याला एज्युकेशन कायदा म्हणतो याला वेगळी सध्या जागा दिलेली आहे. RTE या कायद्याअंतर्गत देशातील गोरगरिबांची जी बालक आहेत त्यांना…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारआज रोजी संपाच्या पाचव्या दिवशी तहसील कार्यालया प्रगणांत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी बोंबाबोंब आंदोलनाने व घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. सरकारने दिलेल्या नोटीसांची होळी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात केला. यावेळी संपातील कर्मचाऱी म्हणाले की, “जोपर्यंत पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल तसेच कोणीही नोटिसांना घाबरणार नाहीअसा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला.आज कडक उन्हात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आणि काही कर्मचाऱ्यांना आलेल्या नोंटिसांना न जुमानता त्याची होळी करण्यात आली. आज या आंदोलन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. डॉ.अरूण जाधव, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, प्रा. डॉ. सुनील नरके,…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडेअर्थसंकल्पीय अधिवेशनात विजेच्या विविध समस्यांबाबत सुरु असलेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार अँड . राहुल कुल म्हणाले कि, विजबिला संदर्भात कधी तीन महिने, कधी सहा महिने तर कधी बारा महिन्यांनी बीज बिलांची मागणी होऊन शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर बंद केले जातात. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. सर्व पक्षांना विचारात घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी दूरगामी धोरण ठरविण्याची गरज असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी दौंड चे आमदार राहुल कुल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. तसेच बिबट्या व इतर हिंस्र वन्यप्राण्यांचा देखील ग्रामीण भागात वावर वाढला असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना दिवसा वीज मिळावी…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड:- मुख्यमंत्री सहाय्यता निधी, आमदार प्रा राम शिंदें यांच्या प्रयत्नातून व भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले यांच्या प्रयत्नाने रुग्ण बळीराम लक्ष्मण कात्रजकर, ठिकाण: कुसडगांव, तालुका जामखेड,जिल्हा अहमदनगर हे काही दिवसापूर्वी आपल्या मुलाचा सुपा ( अहमदनगर) येथे अपघात झाला होता,त्यामध्ये बळीराम लक्ष्मण कात्रजकर यांना जास्त मार लागल्याने त्यांना अहमदनगर येथे मॅक्स केअर हॉस्पिटल येथे ऑपरेशन करण्यात आले. जवळपास या ऑपरेशनसाठी ३ लाख रुपये खर्च आला असून ही माहिती कळताच या ऑपरेशन साठी विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी शिफारस पत्र दिले असता बळीराम लक्ष्मण कात्रजकर यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य रुपये 1,00,000/- (एक लाख रुपये)…
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार राज्यामध्ये शासकीय,निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला असून या संपाच्या अनुशंगाने जामखेड तालुका कर्मचारी कृती समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. हा संप संपूर्ण महाराष्ट्र भर असून आज जामखेड येथे तहसिल कार्यालय येथे “एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच , कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशी ग्वाही यावेळी जामखेड तालुका कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी दिली. याप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापूराव माने, अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विश्वस्त मुकूंदराज सातपुते,शिक्षक नेते राम निकम,…
राज्यात सध्या जुन्या पेन्शनसाठी 18 लाख कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अशातच मेस्मा म्हणजेच, अत्यावश्यक सेवा परीक्षण कायदा मंगळवारी 14 मार्चला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात कोणत्याही चर्चेशिवाय बहुमताने मंजूर करण्यात आलाय. घाईघाईने मंजूर करण्यात आलेला हा कायदा आता सध्या संप करत असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला, तर त्यांच्यावर 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाच्या शिक्षेची तरतूद केली जाऊ शकते. पण हा मेस्मा कायदा म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊयात मेस्मा कायद्याबाबत सविस्तर.. बंपर ऑफर हे नक्की वाचा:iphone Offer : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा IPhone; मेस्मा कधी लावण्यात येतो?नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळायलाच हव्या. त्यासाठी या कायद्याचा…