सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.19, वाढदिवसानिमित्त थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, मित्रजनांचे सहकार्य तसेच कार्यकर्ते व समर्थकांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी केले. तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, माजी जि.प.सभापती किशोर बलांडे, अशोक सूर्यवंशी, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, सिल्लोड न.प.गटनेता नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. मच्छिन्द्र पाखरे, जिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या…
Author: mahalokwani
दोन वर्षांनी कोरोनातून नुकताचं कुठं सुटकेचा श्वास मिळाला असतांना आता काही देशात एक व्हायरस पाय पसरू लागला आहे. कतारमध्ये सुरू झालेल्या फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी जगभरातून लाखो फुटबॉल चाहते गेले होते. अशातच कतारहून परतणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना डॉक्टरांनी कडक इशारा दिला. परतणारे चाहते हे उंटांमध्ये आढळणारा घातक ‘कॅमल फ्लू’ पसरवू शकतात असं त्यांनी म्हटल आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, कॅमल फ्लू’ हा रोग आहे तरी काय? त्याची लक्षणे काय आहेत? याच विषयी जाणून घेऊ. कॅमल फ्लू म्हणजे काय? कॅमल फ्लू हा एक प्रकारचा व्हायरस आहे. जो उंटांपासून मानवांमध्ये पसरतो. ज्या देशांमध्ये उंटांची संख्या जास्त आहे,…
अत्यंत थरारक चुरशीची फायनल मॅच मध्ये अर्जेंटिना विश्वविजेता अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये खेळलेल्या फायनल मॅच मध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउट मध्ये फ्रान्स वर मात करून विश्वविजेत्या पदावर आपले नाव कोरले, अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा हा फुटबॉलचा विश्व कप जिंकला आहे.मॅचच्या सुरवातीपासून अर्जेंटिनाने आक्रमक खेळाला सुरुवात केली, पहिल्या 45 मिनिटाच्या हाफ टाईम मध्ये फ्रान्स वर 2 गोल करून विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केली. परंतु फुटबॉल हा असा खेळ आहे की शेवटच्या मिनिटाला काय होईल हे सांगता येत नाही, आणि तेच या मॅच मध्ये पहावयास मिळाले.दुसऱ्या हाफ टाईममध्ये 80 मिनिटापर्यंत अर्जेंटिना 2-0 गोलने पुढे असताना अचानक फ्रान्सने 84 मिनिटाला पहिला गोल केला व 86 व्या मिनिटाला…
नगर ता. 18 पोलीस भरतीची सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिंदे व फडणवीस सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे, बऱ्याच दिवसापासून नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या युवकांसाठी हा आनंदचा क्षण म्हणावा लागेल. पहिल्यांदा चालक पदासाठी मैदानी होईल, त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. रोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल. जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन 22 डिसेंबरपर्यंत पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे. अशी असणार मैदानी चाचणी*उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाईल. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज भरलेल्या उमेदवारांना कुठे परीक्षा द्यायची हे ठरवावे लागेल. कोणालाही दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी चाचणी घेतली जणार आहे.…
महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतची मुदत संपून आज महाराष्ट्रातील 7721 ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात झाली आहे या मतदान प्रक्रिया मध्ये सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिष्ठा पणाला लागली असून गाव पातळीवरील सर्व कार्यकर्ते व युवक वर्ग यांना या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेताना दिसत आहे त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुका मध्ये चांगलीच रंगत येतांना दिसत आहे अलीकडील राजकीय घडामोडी तसेच नवीन आलेले शिंदे फडणवीस सरकार, महाविकास आघाडी यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आमने सामने लढत होताना दिसत आहे. गाव पातळ वरील ग्रामपंचायत निवडणूक असली तरी येणाऱ्या लोकसभा- विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष हे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी येईल या दृष्टीने प्रयत्न करतांना दिसत आहे, काही ग्रामपंचायत निवडणुका या प्रतिष्ठेच्या ठरत…
“जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयाच्या कोरलेलं असलं जगणं म्हणजे खरं जगणं त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलसं करून घेतलं होत, त्यांचा तो गौर वर्ण , सिंहासम स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा ,त्यांच्या बोलण्यातील करारी बाणा , हिमालयासारखी उंची,चमकत्या डोळ्यातील कर्तृत्वाची धजग, बलशाली शरीर, वक्तृत्व तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत त्यांच्या पहिल्याच lecture मध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते माझा कुणी जीवन साथी असतील तर फक्त हेच त्यांना बघताच मला माझ्या “त्या स्वप्नाची” आठवण झाली जे मला रोज…
युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने शुक्रवारी युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला केला असून 70 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहे , रशियाने युक्रेनला आपत्कालीन ब्लॅकआउट लागू करण्यास भाग पाडले, मध्य क्रिवी रिहमध्ये अपार्टमेंटला ब्लॉकला मिसाईल धडकल्याने तीन लोक ठार झाले आहे . दक्षिणेकडील खेरसनमध्ये गोळीबारात आणखी एकाचा मृत्यू झाला असे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले. व्यापलेल्या पूर्व युक्रेनमधील रशियन-स्थापित अधिकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेनियन गोळीबारात 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की रशियाकडे अजूनही अनेक मोठ्या हल्ल्यांसाठी पुरेशी क्षेपणास्त्रे आहे. त्यांनी पुन्हा कीवला अधिक आणि चांगल्या प्रकारचे हवाई संरक्षण प्रणाली पाश्चात्य मित्र राष्ट्रांना पुरवठा करण्याचे आवाहन केले.
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे. ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने तिला समन्स बजावले आहे. ईडीने रकुलला 19 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने टॉलिवूडमधील अनेक कलाकारांची चौकशी केली आहे. सप्टेंबरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी रकुलची चौकशी केली होती. हे प्रकरण 40 वर्षे जुने ड्रग्सशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक कलाकारांनाही समन्स बजावण्यात आले होते. ईडीने या प्रकरणाची चौकशी केली केल्यानंतर त्यांना मनी लाँड्रिंगचा संशय आला. त्यांनी या संदर्भात तपास सुरू केला असून रकुल प्रीत तसेच चार्मे कौर, पुरी जगन्नाथ, तेजा, मुमैथ खान आणि राणा दग्गुबती यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलण्यात आले आहे.…
महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन. महामोर्चाला दोन लाख लोक येणार असल्याचं महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात येतंय. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आज सकाळी 9 वाजता महामोर्चाला सुरुवात होणार आहे. भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनी समोर मोर्चेकरी जमतील. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर या मोर्चाची सांगता होईल. मविआच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपे माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे.…
सिडनी: क्रिकेटच्या खेळात अनेकदा एखाद्या टीमचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. पण बिग बॅश लीगमध्ये तर हद्दच झाली. बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी एडिलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरच्या टीमला फक्त 15 रन्समध्ये ऑलआऊट केलं. सिडनी थंडरची टीम फक्त 35 चेंडूत ऑलआऊट झाली. सिडनीच्या टीममध्ये एलेक्स हेल्स, रिली रुसोसारखे मोठे खेळाडू होते. पण तरीही टीमने सरेंडर केलं. बिग बॅश लीगच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2015 मध्ये मेलबर्न रेनीगेड्सची टीम 57 रन्सवर ऑलआऊट झाली होती. पुरुष क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कुठला संघ 20 रन्सपेक्षा पण कमी धावसंख्येत ऑलआऊट झालाय. सिडनी थंडरची 15 ही धावसंख्या टी 20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी टर्कीच्या नावावर…