Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील तहसिल कार्यालयच्या प्रागणात शासकीय,निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत सर्व कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनसाठी जामखेड मध्ये तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. “एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच , कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणेने जामखेड तहसील कार्यालय दुमदुमून निघाले तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी थाळी नाद आंदोलन केले ,जामखेड मध्ये शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत सर्व कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप 14 मार्च 2023 पासून चालू झाला आहे , आज चौथा दिवस या संपासाठी प्रा मधुकर राळेभात, अँड.डाँ. अरुण जाधव यांनी पाठिंबा देवून समर्थन दिले. याप्रसंगी ज्येष्ठ…

Read More

नाशिक : भाजपाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात उंच पुतळा हा नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे साकारण्यात आला आहे. याच सर्वात मोठ्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण होणार आहे. यावेळी नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि पक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. जवळ जवळ सोळा फूट उंचीचा हा पुतळा आहे. यामध्ये मुंडेंच्या सार्वजनिक कार्यक्रमाला नितीन गडकरींची पहिल्यांदाच उपस्थिती असल्याने राजकीय चर्चा होऊ लागल्या आहेत. भाजप नेते नितीन गडकरी पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातील सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने नितीन गडकरी या कार्यक्रमात नेमकं काय बोलतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे. नाशिकच्या सिन्नर येथील नांदूर शिंगोटे या गावात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे…

Read More

तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख म्हणजे IMEI क्रमांकाद्वारे त्याचे लोकशन शोधू शकता. I M E I हा 15-17 अंकी क्रमांक आहे जो फोनमध्ये एम्बेड केलेला असतो. हे प्रत्येक मोबाइलला एक वेगळी ओळख देते आणि फोनचे स्थान ऑनलाइन ट्रॅक करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. Staunch चे IMEI ट्रॅकर हे एक साधन आहे ज्याचा वापर IMEI द्वारे विनामूल्य फोन ट्रॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो. फक्त IMEI ट्रॅकर उघडा आणि प्रदान केलेल्या बॉक्समध्ये 15 अंकी IMEI क्रमांक प्रविष्ट करा. आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर, ट्रॅक फोन बटणावर टॅप करा. आता तुम्हाला गुगल मॅपवर हरवलेल्या फोनचे…

Read More

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. जयंती उत्सवानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत जयंती उत्सव समितीची स्थापना करुन जयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकप्रसंगी अक्षय बोरुडे, तेजस गायकवाड, शोभाताई गाडे, स्वप्निल भिंगारदिवे, मिरा गवळी, महेमुदा पठाण, रेखा डोळस, हिरा भिंगारदिवे, संगीता बार्वेकर, रेखा साळवे, रंजना भिंगारदिवे, सुनिता भिंगारदिवे, राधा पाटोळे, अबूबखर शेख, अमोल आडबले, शहबाज शेख, आय्युब शेख, सिद्धार्थ राजगुरू, रामभाऊ आजबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या…

Read More

महालोकवाणी न्यूज: ब्लॅकमेलिंगचा प्रयत्नअमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका फॅशन डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहितीही दिली. माझ्या पत्नीने या प्रकरणाचा एक एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दबाव आणून माझ्यामाध्यमातून काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. आधी पैशाची ऑफर दिली. नंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे आहेत. त्याची एक मुलगी आहे. शिकलेली आहे. हुशार आहे. ही मुलगी 2015-16च्या दरम्यान अमृताला भेटत होती. नंतर तिचं येणं बंद झालं. अचानक 2021 मध्ये या…

Read More

महालोकवाणी न्यूज: जामखेड तालुक्यातील एका सामान्य कुटूंबातील व्यक्तीमत्व असणारे निलेश भाऊ गायवळ हे पुणे येथे कामानिमीत्त गेले, आणि त्यांनी पुणे येथे आपल्या सामाजिक , राजकीय जीवन जगत असताना त्यांनी अतिशय खडतर जीवन जगत असताना , मार्ग काढत आपले पुणे येथे आपले साम्राज्य निर्माण केले, त्यांनी सामजिक क्षेत्रात पण उत्तम कार्य करत गोरगरीब लोकांना मदतीचा हात देत असतात निलेश (भाऊ ) गायवळ यांच्या वाढदिवसाला त्यांचे असंख्य असणारे कार्यकर्ते हे सामाजिक भान जतन करत भाऊंचा वाढदिवस हा गोरगरीब लोकांना मदत करत , किंवा गोशाळेत चारा वाटप करत, तसेच अनाथ मुलांना मदत करत , साजरे करत असतात , निलेश भाऊंच्या वाढदिवसानिमीत्त अहमदनगर येथील…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठाण संचलित साकेश्वर गो – शाळा येथे सामाजिक कार्यकर्ते मा.निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसा निमित्त ७० गायींना ३ दिवस पुरेल इतका हिरवा चारा देण्यात आला. याप्रसंगी श्रीशिवप्रतिष्ठाण चे तालुका अध्यक्ष पांडूरंग भोसले,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका अध्यक्ष जयसिंग उगले,रमेश बोलभट (सर),बापू कदम ,समीर गायकवाड , भरत वाघुले निखिल आरडे , हर्षद ढाळे,विशाल दौंड, बबलू गोलेकर, योगेश सुरवसे, किशोर गायवळ,खंडागळे नाना, शिंदे बी.एस, मयुर भोसले,संतोष पवार ,पुलावळे महाराज, तुषार बोथरा, अभिमन्यू पोते आदी उपस्थित होते. प्रहार चे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांनी निलेश भाऊ हे नेहमी सामाजिक उपक्रम अग्रेसर असतात त्यांचे…

Read More

महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कर्जत आणि जामखेड (Karjat-jamkhed) या दोन्ही शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यास उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी आज विधानसभेत केली. वाहतुकीचा भंग करणे, चोरी, महिला आणि मुलींची छेडछाड यासह इतर गुन्ह्यांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्जत आणि जामखेड या दोन्ही शहरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तसेच उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करण्याचीही विनंती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ५ डिसेंबर २०२२ रोजी…

Read More

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार दिनांक 14/03/ 2023 रोजी जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती दिलीप गुगळे यांचा वाढदिवस श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित जामखेड येथील निवासी मूकबधीर विद्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. निवासी मुक बधिर विद्यालयात येथे वाढदिवसा निमित्त किराणा साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केले, आपला वाढदिवस निवासी मुक बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये साजरा करून मुलांना एक आगळावेगळा आनंद देण्याचा सामाजिक उपक्रम दिलीप गुगळे यांच्या माध्यमातून घेण्यात आला.अनाथ निराधार,मुक – बधिर या लोकांची सेवा करणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे.मुक बधीर विद्यालयातील मुलांना खूप चांगल्या प्रकारे येथील शिक्षक सांभाळत आहेत. त्यांचे…

Read More