मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आणि भाषण नेहमीच चर्चेचा विषय असतो. राज ठाकरेंचं भाषण मनसे कार्यकर्ते राज्यभरातून सभास्थळी जमा होतात. मात्र राज ठाकरे यांच्या सभेवर आणि भाषणावर बंदी घालावी अशी मागणी भीम आर्मीने महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहून केली आहे. राज ठाकरे दरवेळी आपल्या भाषणातून दलित, मुस्लीम आणि संविधान विरोधी भूमिका घेत असतात. ते आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना असंविधानिक कृत्य करण्यास सांगतात. त्यामुळेच गुडीपाडवानिमित्त राज ठाकरे यांची शिवाजी पार्कात होणाऱ्या सभेला परवानगी देऊ नये. जर परवानगी दिली असेल तर ती तत्काळ रद्द करावी., असं पत्र भीम आर्मीने पोलीस महासंचालकांना दिलं आहे. भीम आर्मीने पत्रात काय म्हटलंय? महाराष्ट्र नवनिर्माण…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज:- जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कर्जत / जामखेड | जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तसंच महिला बचत गटांना व्यवसायासाठी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटपही करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात नेहमीच विकासाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यामध्ये त्यांच्या मातोश्री आणि ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांचे मोठे योगदान असते. कर्जतमध्ये नुकत्याच उभारलेल्या शारदाबाई पवार या भव्य सभागृहात ‘जागतिक महिला दिना’निमित्तही त्यांनी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मतदारसंघातील वीर मातांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. तसेच…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे दौंड (Daund)तालुक्यातील रावणगाव बोरीबेल देऊळगाव राजे मार्गावर बोरीबेल गावाजवळ रेल्वे भुयारी मार्ग (RUB) बांधण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर झाल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अँड. राहुल कुल यांनी दिली आहे. रेल्वे लाईनमुळे बोरीबेल हे गाव दोन भागात विभागले गेले असून या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी असलेल्या छोट्या मोरीतून नागरिकांना प्रवास करवा लागत होता. ही मोरी छोटी असल्याने त्यातून फक्त छोटी वाहन जात असल्याने त्या ठिकाणी मोठ्या भुयारी मार्गाची मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक करीत होते याचा विचार करून आमदार अँड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
महालोकवाणी न्यूज: पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी .मोरे वस्ती तालुका दौंड येथील आरोपी .निखिल साबळे याच्या विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल साबळे सोबत मयत प्रियेसीचे 5 वर्षापासून प्रेम संबंध होते पाच वर्ष झाले तरी निखिल माझ्या सोबत लग्न करत नाही आणी लग्नाला नकार देत आहे. .म्हणून मला जगण्याची इच्छा राहिली नाही असे तिने घरी नातेवाईकांना सांगितले.. रात्री उशिरा घरातील सगळे झोपी गेल्यावर तिने आत्महत्या केली.असे समजले. फिर्यादी जबाब देतो की,मी वरील ठिकाणी माझे आई-छाया,भाउ-अजिंक्य,बहीन- साक्षी मोरोपंत गायकवाड वय.22 वर्षे असे एकत्रात राहण्यास असुन मी आर्मी बेस वर्क…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यात ऊसतोड कामगार हे मोठ्याप्रमाणात आहेत, ह्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे असे स्वप्न स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे, स्व.बाळासाहेब विखे पाटील, स्व.राजीव राजळे यांचे होते, हे स्वप्न आपण आता पूर्ण करणार आहोत.या मुलांना चांगल्या शिक्षणा बरोबरच त्यांचे संगोपन देखील चांगले झाले पाहिजे यासाठी पुढील काळात सातत्यपूर्ण काम करणार असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून लवकरच पाथर्डी तालुक्यात सीबीएससीची निवासी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. धनगरवाडी येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी असलेली योजना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना तसेच विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या…
महालोकवाणी न्यूज: चयापचय गतिमान करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे चालणे. ताशी ८ किमी किंवा त्याहून अधिक वेगाने चालल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे १० मिनिटांच्या चालण्याचाही शरीराला फायदा होतो. दररोज ६० मिनिटे चालण्याचे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. १० मिनिटे चालणे : साखर नियंत्रित होते नियमित १० मिनिटांच्या चालण्यामुळे फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड ग्लुकोज सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर ते जास्त फायदेशीर आहे. टाइप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किमान ५००० पावले चालणे आवश्यक आहे. यामध्ये ३००० स्टेप्स ब्रिस्क वॉक म्हणजे गाणे गाता न येण्याएवढ्या वेगाने. 20 मि. चालणे : वृद्धत्व प्रक्रिया मंदावते दिवसातून २० मिनिटे वेगवान चालण्यामुळे मायटोकॉडियाच्या…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शनिवार दि.11.03.2023 रोजी कर्जत येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता, जामखेड शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने जामखेड मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अ.नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग मध्ये शहरातील दोन किलोमीटर अंतरा मध्ये डिव्हायडर एरिया व युटिलिटी एरिया हा कमी करावा याकरिता आज रोजी जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देताना जामखेड व्यापारी असोसिएशन चे शरद शिंगवी, आकाश बाफना, अशोक बाफना, कांतीलाल खिंवसरा आदी सर्व व्यापारी असोसिएशनचे कार्यकर्ते…
महालोकवाणी न्यूज: परळीत( parali) पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात शाब्दिक चकमक सुरु झालीय. आपण दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला पंकजांनी लगावला होता. त्यावरुन पलटवार करताना धनंजय मुंडेंनी पंकजांना खुलं आव्हान दिलंय. परळी तालुक्यातल्या इंदपवाडी आणि जीरेवाडीत जलजीवन कामाचं भूमिपूजन धनंजय मुंडेंच्या हस्ते झालं. यावेळी धनंजय मुंडेंनी, पंकजा मुंडेंच्या काळातील भूमीपजूनं आणि वारस्यावरुन डिवचलं. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालीय…व्हिलन कोण ? म्हणत नाव न घेता, पंकजांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती. बीड (Beed) आणि विशेषत: परळीचं राजकारण म्हटलं की, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्याच अवतीभवती फिरतं. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या कारणावरुन अशी शाब्दिक चकमक…
महालोकवाणी न्यूज: सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: ह.भ.प सतीश आजिनाथ बडे रा.जोगेवाडी ता. पाथर्डी, अहमदनगर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत विषयात शास्त्रीय परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत यश मिळवले आहे.सतीश बडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेवाडी या ठिकाणी झाले आहे.तर श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ या ठिकाणी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण झाले. व उच्च माध्यमिक शिक्षण प्रतिनिधी हायस्कूल अँड जी.डी.बापू लाड कुंडल ता. पलूस जि.सांगली या ठिकाणी झाले आहे. शास्त्री ही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष इतका कालावधीत पूर्ण करावा लागतो. सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बडे यांना प्रो.संस्कृती, विभाग प्रमुख अंबरीशजी खरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ह.भ.प.बडे…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आज दि.11.03.2023 रोजी बारामती येथे देशाचे केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी आले असता, आज रोजी जामखेड व्यापारी असोसिएशनच्या वतीने जामखेड मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी देशाचे नेते माजी केंद्रीय कृषि मंत्री आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते ना.अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आपले लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्यासमवेत जामखेड व्यापारी असोसिएशन तर्फे निवेदन देताना राजेंद्र कोठारी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, ज्येष्ठ नेते अशोक शिंगवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, जेष्ठ नेते सुरेश भोसले, व्यापारी महासंघाचे ज्येष्ठ नेते अशोक चोरडिया, अजय कोठारी, सिव्हिल इंजिनियर मोसम बोगावत,…