Author: mahalokwani

महालोकवाणी न्यूज: सांगवी वाहतूक पोलीसांची मोठी कारवाई : बीआरटी मार्गातून येणाऱ्या २०० वाहनांवर आज दंडात्मक कारवाई; १५ दिवसांत विशेष मोहिमेत १३ लाख ८७ हजारांचा दंड वसूल सांगवी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पंधरा दिवसांत १३ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रक्षक चौक ते पिंपळे सौदागर बीआरटी लेन येथेआज पोलिसांनी कारवाई करत २०० वाहनांवर केसेस व दंड वसूल केला. या विशेष मोहिमेत पोलिसांनी बीआरटीएसमधून येणारी वाहने, पीटीपी नाकाबंदी, नो एन्ट्री, काळ्या काचेच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या १ ते १४ फेब्रुवारी पंधरा दिवसात बीआरटीएस मार्गामधून येणाऱ्या ९५० खासगी वाहनांवर कारवाई करत ६ लाख ३६ हजार…

Read More

पाथर्डी प्रतिनिधी : सोमराज बडेपाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव हद्दीत अपेक्स लॉजवर पोलिसांनी धाड टाकून दोन अल्पवयीन मुलींसोबत असलेले दोन आरोपी व लॉजच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाल कल्याण समितीच्या मध्यस्थीने अल्पवयीन मुलीना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून लॉज मालका सह दोघा आरोपी विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. अल्पवयीन मुली व जोडीदार लॉजवर प्रवेश करणार त्याच क्षणी पोलीसांनी धाड टाकत हि करवाई केली आहे. गोपनीय खबर मिळाल्या वरून सोमवारी दुपारी माळी बाभूळगाव शिवारातील अपेक्स लॉजवर पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सचिन लिमकर,श्रीकांत डांगे,पो.कॉ.ज्ञानेश्वर रसाळ, संदीप कानडे,दत्तात्रय बडधे,कृष्णा बडे,किरण बडे,मनिषा वारे यांच्या पथकाने घातलेल्या धाडीत माळी बाभूळगाव येथील…

Read More

ठाणे : डॉ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे. ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे. या संभाषणात, ” माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं. तेव्हा रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका…

Read More

महालोकवाणी न्यूज ;अहमदनगर शहरात शिंदे गटाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांच्या एका लग्नात झालेल्या वादाचे रुपांतर थेट दगडफेकीत झाले आहे. भाजपचे(BJP) नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांचा एका लग्नात वाद झाला होता. या वाद विकोपाला गेल्याने मंगळवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातपुते यांच्या केडगामधील हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या दगडफेकीमुळे अहमदनगर…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावेघेता घेता देणाऱ्याचेदोन्ही हात ही घ्यावेअश्या प्रकारे पसायधान हॉटेलचे मालक श्री ,श्रीराम न्हाणे व बाळकृष्ण न्हाणे यांनी दि.13 रोजी पुणे_सोलापूर हायवे शेजारील स्वामी चिंचोली तालुका दौंड येथिल पसायधान हॉटेल च्या तिसऱ्या वर्धापनदिना निम्मित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना स्वादिष्ट रुचकर असे भोजन दिले शाळेतील मुलांनी जेवणाचा अस्वाद घेतला मुलांना हॉटेलमध्ये जेवायला मिळाल्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते व शाळेचे मुख्याध्यापिका रामगुडे मॅडम. व त्यांचे सहशिक्षक काळे मॅडम, पवार मॅडम,हिवरे सर, यांनी पसायदान व्हेज चे मालक श्रीराम नहाने व बाळकृष्ण नहाने यांचे आभार मानले शाळेच्या मुख्याध्यापिका रामगुडे मॅडम यांनी हॉटेल पसायदान व्हेज…

Read More

महालोकवाणी न्यूज: गेवराई प्रतिनिधी: समाधान सम्राट गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथे शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमातील दिनांक १९फेब्रुवारी रोजी रात्री ०९:०० वाजता शिवचरित्रकार श्री ह भ प गोविंद महाराज नाईकवाडे यांचे शिवकिर्तन होणार आहे आणि दि.२०फेब्रुवारी सोमवार रोजी बाल महोत्सव {गॅद्रींग} होणार आहे दिनांक २१ फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री ०५:००वाजता भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भारावलेले वातावरण, उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात संपुर्ण जग भगवेमय झाले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून रविवार पासुन ठाकर आडगांव येथील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती…

Read More

अहमदनगर शहर प्रतिनिधी: विजय मते नगर – प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शाळेबद्दल प्रेम, आपुलकी व शिक्षकांविषयी आदराची भावना ठेवावी. शाळेने तुम्हाला दिलेला आत्मविश्वास भविष्यात यशाच्या शिखरावर नेत असतो. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून तुमच्या कला-गुणांना वाव मिळतो. त्यामधून आपली संस्कृती जोपासावी, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.सावेडी उपनगरातील निर्मलनगर येथील सौ.लक्ष्मीबाई शांतराम डोके विद्या मंदिर व साई माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेवक सुनिल त्र्यंबके, तोफखाना पोलिस स्टेशनचे सावळेराम क्षीरसागर, पोलिस नाईक श्री.शेख, श्री.भोसले, मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे, मंदाकिनी पांडूळे, आशा धामणे, सुजाता कर्डिले, ज्योती पवार, मंजू नवगिरे, संजोग बर्वे, संभाजी पवार आदि उपस्थित होते. श्री.त्र्यंबके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

Read More

इंटरनेटवर अनेक गोष्टी आपल्यापैकी खूपजण थेट घरीच ऑर्डर करतात. ऑनलाइन डिलेव्हरीच्या माध्यमातून आज अगदी किराणामालापासून ते खाण्यापर्यंत आणि कपड्यांपासून ते औषधांपर्यंत सर्व गोष्टी घरबसल्या मिळतात. या नवीन तंत्रज्ञानाच्या जगात अनेक जुन्या गोष्टी बदलून आपण नव्या गोष्टी स्वीकारल्या आहेत. आपण आता केवळ ऑनलाइन ऑर्डर देऊन घरी गोष्टी मागवत नाही तर सर्व गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही बदलला आहे. आपलं राहणीमान बदलल्याने त्याचा आरोग्यावर आणि वस्तूंच्या वापरावही परिणाम होऊ लागला आहे. आधी आपण लस्सी, लिंबू पाणी यासारख्या गोष्टींचा प्राधान्य द्यायचो. तेच आता आपण कोल्ड ड्रिंक्सला देतो. आधी घरी गुळ आणि शेंगदाणे खायचो आता घरी चिप्स खातो. अशा अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अगदी साबणापासून…

Read More

अहमदनगर : नगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून श्री.सिद्धाराम सालीमठ यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे, तर नगरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश येथील प्रशासनाला प्राप्त झाले आहे. नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे गेल्या अडीच वर्षापासून नगर येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये नगर जिल्ह्यातील महसूल यंत्रणा मध्ये अनेक विषय हाताळले गेले ,त्यामध्ये महसूल विभागाचे डिजिटल उतारे कशा पद्धतीने मिळतील याकरता विशेष प्रयत्न केले, त्यांच्याच कारकिर्दीमध्ये नगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुद्धा उद्घाटनाचा विषय झाला तसेच महसूल यंत्रणा गतिमान करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम सुद्धा या जिल्ह्यामध्ये राबवली. अनेक विषयांच्या…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड। सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे ‘एमपीएससी’ची परीक्षा बहुपर्यायी न होता ‘युपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परंतु हा निर्णय लगेचच लागू न करता २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती आणि त्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या प्रश्नी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची व्यक्तीशः भेट घेऊन विद्यार्थ्यांची…

Read More