Author: mahalokwani

महालोकवाणी न्यूज:- जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारभुतवडा येथील बाप्पू तुकाराम अडाले या शेतकऱ्याच्या रानामध्ये पाणी शिरले असून पिकांचे नुकसान होत आहे. या बाबत माहिती अशी की,भुतवडा येथील जामखेडला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज असल्याने रानात पाणी शिरले असून पिकांची नासाडी होत आहे.यातच ज्वारी काढणीला आली आहे ऐन तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यापासून हिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांनी वारंवार जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे तसेच लेखी पत्राद्वारे व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तक्रार करुन देखील प्रश्न सुटेना प्रासंगीक विचारणा केली असता पाणी पुरवठा विभागचे अधिकारी म्हणतात की, मटेरीयल नाही असे सांगून कामचुकारपणा करीत आहे, व आमच्या प्रश्नांना…

Read More

महालोकवाणी न्यूज: नगर – कोणत्याही क्षेत्रात काम करतांना कार्यकर्त्यांची ताकद पाठीशी पाहिजे. नगर जिल्ह्यात बारा बलुतेदार महासंघ स्थापन झाल्यापासून यामध्ये कार्यकर्ते एकानिष्ठ राहुन काम करतात त्यामुळे विविध प्रश्न सुटत आहे. हेच कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्याने माझी जिल्हा संघटक पदी झालेली निवड संघटनवाढी विषयी मला पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर कविटकर यांनी केले. हे नक्की वाचा Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी ! नगर शहरातील आगरकर मळा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कविटकर यांची ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अनिल इवळे,…

Read More

महालोकवाणी न्यूज: प्रतिनिधी :- विजय मते नगर – राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्यावतीने नाभिक समाजातील विवाहइच्छूक वधू-वर व पालकांसाठी सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी शिर्डी, जि.अहमदनगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. हा वधू-वर मेळावा सप्तपदी लॉन, रेल्वे स्टेशनजवळ, शिर्डी, ता.राहता, जि.अहमदनगर येथे सोमवार दि.13 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत होत आहे. या मेळाव्यात वधू-वरांना स्वत: उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. हे पण वाचा : Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी ! या मेळाव्यात प्रथम वधू-वर, घटस्फोटीत, दिव्यांग, विधुर, अंध आदिही सहभागी…

Read More

महालोकवाणी न्यूज:- Solapur आतापासूनच सोलापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून पसंती आणि नापसंती सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच विधान केले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे की राष्ट्रवादीकडे याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे रोहित पवार म्हणाले होते. तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शाब्दिक वार सुरू झाले. आता रोहित पवारांच्या विधानावर बोलताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी खिल्ली उडवली आहे. कोण रोहित पवार? त्यांना मॅच्युरिटी यायला वेळ लागेल, आ. प्रणिती शिंदे यांनी पवारांची खिल्ली उडवली. @RRPSpeaks @ShindePraniti #Solapur #pranitishinde pic.twitter.com/TmSW75vlc8— Mahalokwani (@mahalokwani) February 10, 2023 प्रसार माध्यमांसोबत प्रणिती शिंदे म्हणाल्या…

Read More

महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधि: धनराज पवाररत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची फास्ट ट्रॅक चौकशी करण्यात यावी याबाबत सविस्तर माहिती अशी की,रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावर दि.०६/०२/२०२३ रोजी दु. ०१.०० वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपा जवळ यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली होती. यामध्ये संशयित असलेले आरोपी पंढरीनाथ अंबरकर यांना अटक झालेली असुन या गुन्ह्याची चौकशी फास्ट ट्रॅकने करण्यात यावी व त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी. माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी दिलेल्या या निवेदनामध्ये म्हटले आहे की,वारंवार होणाऱ्या पत्रकारांच्या हत्या सतत होणारे हल्ले याची शासन स्तरावर योग्य दखल घेण्यात यावी. या घटनेचा निषेध करत तहसिल…

Read More

महालोकवाणी न्यूज: नगर – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावारुपाला आलेले आहे. महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कायम प्रयत्नशील आहे. संशोधकांना आधुनिक सुविधासाठी निधी उपलब्ध करुन देत असल्याने विद्यार्थ्यांचा या शिक्षण संस्थेकडे कायम ओढा राहिलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याची माहिती प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी दिली.नगर जिल्ह्यातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखले जाणारे डॉ.विखे पाटील महाविद्यालयाचे नाव सर्व कसोटींमध्ये सिद्ध झाले आहे. अशा या महाविद्यालयाचे मुल्यमापन करुन मानांकन देण्यासाठी शुक्रवार दि.10 व 11 फेब्रुवारी रोजी दोन दिवस राष्ट्रीय ‘नॅक’ कमिटीद्वारे मुल्यमापन होणार आहे, असे विखे फौंडेशनचे उपसंचालक…

Read More

महालोकवाणी न्यूज दि. १०/०२ /२०२३ अहमदनगर: अर्थसंकल्प देशाच्या विकासाला चालना देणारा असावा, त्यासाठी तो सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांनी मांडले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील अर्थशास्त्र विभागाने केंद्रीय अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रा. ह. दरे साहेब होते. बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या कमी करणे, मनरेगा योजनेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात वाढीव खर्चाची तरतूद करणे हा अर्थसंकल्पाचा उद्देश असावा. हा अर्थसंकल्प वरून उत्तम वाटतो, परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर योग्य प्रकारे जनतेपर्यंत जाणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धीमतेला येणाऱ्या काळात उत्तम संधी आहे. सरकारने…

Read More

महालोकवाणी न्यूज: मुंबई, 09 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 27 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. 27 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, तर 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, पण या अधिवेशनाआधीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय सर्जिकल स्ट्राईक होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार बच्चू कडू यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. येत्या 15 दिवसांमध्ये 10-15 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ‘सरकार फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे. 20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण राहील. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल’, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. अलीकडच्या काळातील राजकारण पाहता,…

Read More

सोमवारी, 6 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 4:15 वाजता तुर्कीमध्ये 7.8 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला. तुर्कस्तान आणि सीरिया सीमेजवळ दक्षिण मध्य तुर्कीला भूकंपाचा धक्का बसला आणि त्यानंतर केवळ 11 मिनिटांनी 6.7 तीव्रतेचा आफ्टरशॉक आला. 300 हून अधिक आफ्टरशॉक तुर्कीला हादरले, त्यापैकी सर्वात मोठा भूकंप 7.5 तीव्रतेचा होता. अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अदानीला कोणत्या बँकांनी किती कर्ज दिले ! युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, तुर्कस्तानला आलेला विनाशकारी भूकंप केवळ त्याच्या प्रचंड तीव्रतेमुळेच नाही तर त्यापूर्वीच्या घटना पूर्व अॅनाटोलियन फॉल्ट सिस्टीममध्ये झाल्यामुळे देखील अद्वितीय आहे, जेथे पूर्वी मोठे भूकंप झाले नाहीत. याआधी, तुर्कस्तानमध्ये बहुतेक मोठे भूकंप नॉर्थ अनाटोलियन…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे दि. ०९ फेब्रुवारी २०२३ दौंड शहरातील अक्षय बियर बार येथिल थरारक घटनेची शहरात चर्चा, दि ०८/०२/२०२३ रोजी दौंड रेल्वे स्टेशन बाजूला असलेल्या अक्षय बियर बार येथे दारु पिण्यास आलेल्या बेवढ्यांचा वाद होऊन आपसात जबरदस्त हाणमार झाली असल्याने फिर्यादी नितीन पोपट केंगार रा,वडार गल्ली ता दौंड जिल्हा पुणे, याच्या तक्रारी वरुन दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी विकी गायकवाड,रा, गोवागल्ली ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गु र नं ९०/२०२३,भा द वि कलम ३२६,५०६,अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हकिकत ता,०८/०२/२०२३, रोजी फिर्यादी दुपारी ४.वा. सु, दौड रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या अक्षय बियर बार मध्ये दारू…

Read More