Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवारजामखेडचे माजी सरपंच स्व. महादेव (आप्पा) राळेभात पा. यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील साकत येथील श्री शिवप्रतिष्ठाणचे श्री साकेश्वर गोशाळेत सकाळी ८:०० वाजतास्व.महादेव (आप्पा) राळेभात पा. यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच शहाजी (काका)शाहूराव राळेभात व बापू देशपांडे यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आला. यावेळी बोलतांना पांडुरंग भोसले म्हणाले, जिवनामध्ये माणुस हा कार्याने मोठा होत असतो,असेच अनमोल कार्य स्वर्गीय महादेव (आप्पा) राळेभात यांनी जामखेड ग्रामपंचायत चे सरपंच असताना केले.त्यांनी शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांना न्याय देण्याची भुमिका ठाम असायची तसेच त्यांचे कार्याची दखल तालुका,जिल्हा या ठिकाणी नाव जरी घेतले जामखेडचे भुषण म्हणून त्यांच्या…

Read More

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त बाळासाहेबां ची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले.शहरातील महावीर भवन येथे सकाळी १०.०० वाजता शिबीराचे उद्घाटन करण्यातआले.यावेळी रक्तदात्यांनी रक्तदानाला सुरवात केली . या प्रसंगी बोलताना प्रा. कैलास माने सर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार. एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आज रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच जामखेड शहरामध्ये महावीर भवन येथे उद्घाटन संपन्न झाले असून सर्व रक्तदात्यांना आवाहन केले की,जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदान शिबीरामध्ये सहभागी होवून रक्तदान करावे . युवा सेनेचे वराट म्हणाले की, रक्तदानाचा…

Read More

महालोकवाणी न्यूज राज्याचे राजकारण सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीरुन तापले आहे. निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अशातच घटनातज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीसंदर्भात बोलताना असीम सरोदे म्हणाले की ”चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कारण शिवसेनेसंदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये जर १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होईल. विधानसभा भंग झाली तर मग निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही” दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी स्टार प्रचारक आणि प्रभारींच्या नेमणुकाही केलेल्या आहेत. त्यामुळे असीम सरोदे यांच्या विधानामुळे नक्कीच उमेदवारांचे…

Read More

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड ( पुणे) ला अनेक गुन्ह्यात हवा असणारा व गेल्या अनेक दिवसांपासुन पोलीसांना चकवा देत फरार असलेला जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरड) येथील आरोपी सावळा शिवाजी खाडे यास मोठ्या शिताफीने अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. या दमदार कामगिरीमुळे जामखेड पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड, पुणे येथील अनेक गुन्ह्यात पोलीसांना चकवा देत फरार असलेला आरोपी सावळा शिवाजी खाडे, रा. पाटोदा (ग), ता. जामखेड, जि. अहमदनगर हा जामखेड मध्ये येत असल्याची माहीती पोना / अजित कुटे, अंमली पदार्थ…

Read More

जामखेड प्रतिनिधि – धनराज पवार जामखेड : जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेले व्यापारी मा. प्रफुल सोळंकी यांनी एम.एस.ई.बी (MSEB) च्या गलथान कारभारामुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे असे उद्गार रोजी व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली असून याबाबत माहिती अशी की, मीटर वरील रीडिंग न जुळवता आवाचे सव्वा कर आकारले जातात. नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया ! अंदाजे लाखोचे बिल देऊन व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार करतात नंतर सेटलमेंट करून बिल कमी केले जाते पण जे लोक कुठलीही शहानिशा न करता बिल भरत असतील त्यांच्यावर किती मोठा अन्याय होत असेल.. स्वतः त्यांनी अनुभवले आहे असे…

Read More

महालोकवाणी न्यूज:- जामखेड प्रतिनिधि:- धनराज पवार दि. ८/२/२०२३ सालाबादाप्रमाणे या वर्षी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज युवा मंच, जामखेड सराफ व सुवर्णकार असोशिएसन तालुका सोनार समाज यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३७ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पवृष्टी व गुलालाची उधळ्ण करत सकाळी १०.०० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून भजन करत टाळ, मृदूंग व पखवाज च्या गजरात हरिनामाचा गजर करत छत्रपती शिवाजी महाराज पेठ,जयहिंद चौक, बिड रोड कॉर्नर, तहसिल रोड, कोर्ट रोड,सोनार गल्ली,गढी,महादेव गल्ली पर्यंत प्रतिमा मिरवणुक काढण्यात आली. “श्री संत शिरोमणी नरहरी महाराज की जय घोषात…

Read More

गोरगरीब, वंचित,अनाथांची सेवा करणे हाच उद्देश – प्रा.कैलास माने सर जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवारमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने म्हणाले,अनाथांचे नाथ या युक्तिप्रमाणे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त गोरगरीब, वंचित,अनाथांची सेवा करणे हाच उद्देश आहे. वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप ,निवारा बालगृह येथे औषधे किट वाटप,मदरसा येथे अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे, प्रत्येक रक्तदात्याला गिफ्ट स्वरूपात हेडफोन टिफिन बॉक्स व ट्रॅक सूट देण्यात येणार आहेत हे भव्य रक्तदान शिबीर हे शहरातील महावीर…

Read More

जामखेड प्रतिनिधि धनराज पवार – पाटोदा गरडाचे येथे आज रोजी जामखेड, कर्जत – श्रीगोंदे या रस्त्याचे काम चालू आहे , संम्बधित ठेकेदारा कडून वाहतूक नियमांचे फलक लावलेले नव्हते त्यामुळे या ठिकाणी या अनेक अपघात झाले होते , या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी आंदोलनचा इशारा दिला होता त्या अभावी प्रवासी नागरिकांना, अपघाताला समोरो जावे लागत होते, गेल्या वर्षभरात लहान मोठे अपघात झाले असून, काहींना जीवाला मुकावे लागले आहे. पाटोदा गावापासून २ किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर मुरुमाचे ढिगारे हे गतिरोधका सारखे असल्या कारणाने अपघाताला निमंत्रण देत आहेत, हे मोटरसायकल वरून जात असताना अचानक दिसलेल्या ढिगाऱ्यावरून गाडी घसरून…

Read More

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार जामखेड : आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. दोन दिवसांपुर्वी जिल्हा नियोजनकडे मतदारसंघातील डिप्यांसाठी 2 कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर आता मतदारसंघातील 26 गावांमधील 28 कामांसाठी 2 कोटी 14 लाख रूपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आमदार प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून सादर करण्यात आला आहे. नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया ! स्थानिक विकास निधीतून 26 गावांसाठी 2 कोटी 14 लाखांच्या निधीचा प्रस्ताव दाखल ! कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे यांनी…

Read More

महालोकवाणी न्यूज:- जामखेड प्रतिनिधि:- धनराज पवार गेल्या वर्षभरापासून जामखेड – पाटोदा(ग) रोड चे काम प्रगती पथावर असून, कामाच्या ठिकाणी, संम्बधित ठेकेदार कंपनीकडून, कसल्याही प्रकारचे काम चालू असल्याचे व वाहतूक नियमांचे फलक लावलेले नाहीत, त्या अभावी प्रवासी नागरिकांना, अपघाताला समोरो जावे लागत आहे, गेल्या वर्षभरात लहान मोठे अपघात झाले असून, काहींना जीवाला मुकावे लागले आहे. हे पण वाचाच :- नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया ! पाटोदा गावापासून २ किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर मुरुमाचे ढिगारे हे गतिरोधका सारखे असल्या कारणाने अपघाताला निमंत्रण देत आहेत, मागील काही दिवसात, यामुळेच. चंदु मंडलिक (जवळका) यांचा मृत्यू झाला…

Read More