Author: mahalokwani

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. अशातच राज्याचे नवीन राज्यपाल कोण असणार? याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) राज्यपाल पदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. Sidharth-Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थचं लग्न: शेरशाहच्या सेटवर जुळलेलं प्रेम ते लग्नाची गाठ ! “नियम आणि कायद्यानुसार, एखाद्या राज्याचा नागरिक त्याच राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. सध्या या देशात आणि राज्यात अनेक गोष्टी घटनाबाह्य होत आहेत, असं काही घटनाबाह्य कृत्य केलं असेल तर…

Read More

मुंबई : बॉलिवूडच्या बहुचर्चित अभिनेतासिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीयांचं अखेर लग्न लागलं. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्येसिद्धार्थ आणि कियारा विवाहबद्ध झाले. दोघांचा शाही विवाह सोहळा रंगला. 4-5 दिवसांपासून दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली होती. बॉलिवूड सेलिब्रेटींसह अनेक दिग्गज मंडळी सिद्धार्थ कियाराच्या लग्नाला उपस्थित होती. दोघांच्या लग्नाची चाहते आतूरतेनं वाट पाहत होते. ANI नं दोघांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण.. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची मागचे महिनाभर प्रचंड चर्चा सुरू होती. दोघांनाही नवरा नवरीच्या वेशात पाहण्यासाठी सगळेच उत्साही होते. मात्र लग्न लागून 5 तास झाले तरी दोघांच्या लग्नाचा एकही फोटो…

Read More

महालोकवाणी न्यूज:- जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवारजामखेड शहरातील श्री नागेश विद्यालय पाठीमागे बौध्दाचार्य बलभिम जावळे यांचे तथागत बुद्ध विहार येथे आज रोजी माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचं त्रिशरण पंचशील बौद्धाचार्य आयु. बलभिम जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पडला. हे पण वाचा Balasaheb Thorat: ब्रेकिंग न्यूज काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरातांचा राजीनामा यावेळी बौद्धाचार्य बलभिम जावळे म्हणाले,प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे पत्नीची खंबीर साथ होती त्यापैकी डॉ.…

Read More

महालोकवाणी न्यूज Balasaheb Thorat | नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उतरलेत. नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला आहे. (Balasaheb Thorat) नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या या…

Read More

महालोकवाणी न्यूज:- ट्रान्स मॅन साहद आणि ट्रान्स वुमन झिया पावल हे तृतीयपंथीय कपल लवकरच आईबाबा होणार आहेत. केरळमध्ये वास्तव्यास असलेले साहद व झिया गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. तृतीयपंथीय मूल जन्माला घालणार असल्याचं हे भारतातील पहिलंच प्रकरण आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे झियाने ही माहिती दिली आहे. साहद व झिया यांनी मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. तृतीयपंथी कपलने मॅटर्निटी फोटोशूटसाठी हटके पोझही दिल्या आहेत. साहद व झियाच्या या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा रंगली आहे. २३ वर्षीय साहद व २१ वर्षीय झियाने लिंग परिवर्तनासाठी हार्मोन थेरेपी केली आहे.साहदने स्तन काढल्यामुळं आम्ही बाळाला रुग्णालयातील ब्रेस्ट मिल्क बँकेतून दुधाची उपलब्धता करुन देऊ, असंही झियाने पोस्टच्या…

Read More

महालोकवाणी न्यूज:- दि. ७ फेब्रुवारी 2023 धनराज पवार जामखेड प्रतिनिधी जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विविध विकास कामे व्हावीत, यासाठी आमदार राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला निधी मंजुर करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार संबंधित विभागाने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल 4 कोटींचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये जामखेड तालुक्यासाठी दीड कोटी तर कर्जत तालुक्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजुर झाला आहे. सदरचा निधी मंजुर होताच मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघातील विकास…

Read More

महालोकवाणी न्यूज :- जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार जामखेड नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष माननीय विकास तात्या यांच्या आई कै. रतनबाई भगवंत राळेभात यांचे 12 वे पुण्यस्मरण दिनांक 07/02/2023 रोजी योजिले आहे , त्यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वांनी यावे कै. रतनबाई राळेभात यांच्या 12 व्या पुण्यतिथी निमीत्त संध्याकाळी भजन आयोजित करण्यात आले आहे, लेहनेवाडी, भुतवडा रोड, राळेभात पाटील वस्ती, ता. जामखेड संपन्न होईल, तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी दुपारी 12 ते आपल्या आगमना पर्यंत जेवणासाठी हजर राहावे असे आव्हान श्री. भगवंत यशवंत राळेभात श्री. विकास भगवंत राळेभात श्री. दादासाहेब भगवंत राळेभात यांच्या वतीने करण्यात आलेले आहे,शोकाकूल समस्त राळेभात परिवार

Read More

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, सन-२०१० विजय गहिनीनाथ चव्हाण रा. सावरगाव ता. जामखेड याने सावरगाव ता. जामखेड येथे एका महिलेचा खुन केलेला आहे. सदर वेळी त्याचे विरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं.२६१/२०१० भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.सदर गुन्हयाचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक स्वर्गीय श्री. ज्ञानेश्वर ढोकले व त्यांचे पथकाने करुन आरोपी याचे विरुद्ध मा. न्यायालयात भरभक्कम पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केलेले होते. तद्नंतर सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयात होवुन आरोपी याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने सन २०१२ मध्ये त्यास मा. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.…

Read More

26 गावामध्ये सिंगलफेज आणि थ्री फेज डिप्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदेंचा पुढाकार जामखेड : लेखाशिर्ष 2515 मधून कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी 5 कोटींचा निधी आणल्यानंतर काही तास उलट नाही तोच मतदारसंघातील 26 गावांमधील सिंगलफेज आणि थ्री फेज डिप्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे पुढे सरसावले आहेत. मतदारसंघातील शेतकऱ्यांची अन् जनतेची विजेच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी, आमदार प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीकडे 2 कोटींच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला आहे. आपल्या मंत्रिपदाच्या काळात कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या आमदार प्रा राम शिंदे यांच्या विकास कामांचा झंझावात पुन्हा एकदा मतदारसंघात…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या निषेधार्थ काल जळगावमध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले. Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण.. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाख रुपये इनाम देण्यात येईल, अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी…

Read More