महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र सुरुच आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. त्यांना उडवून टाकण्याची धमकी देणार फोन मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी लागलीच फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. त्यावेळी हा फोन पुणे शहरातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी देणारा फोन आला आहे. हा फोन मुंबई पोलिसांच्या ११२ क्रमांकावर आला आहे. फोन करणाऱ्याने फक्त मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकणार असल्याचे म्हणत फोन…
Author: mahalokwani
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. हा शरद पवार यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी पक्ष काय भूमिका मांडतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र राज्यातून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 साली झाली होती. तेव्हापासून सलग 15 वर्ष हा पक्ष…
पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन असं मत प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ने व्यक्त केले आहे. माझं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं आहे. बाबाचं लवकर निधन झालं त्यानंतर घरी कोणीच पुरुष नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा,” अशी इच्छाही गौतमी पाटीलने (Gautami Patil) व्यक्त केली आहे. हे नक्की वाचा: ‘या’ दोन गाड्यांसाठी कंपनीने केलं बुकिंग…
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार जामखेड शहरातील नूराणी कॉलनी , तपनेश्वर रोड येथे डी – फ्लोर डान्स अॅकॅ डमी उद्घाटन संपन्न झाले.डी – फ्लोर डान्स अॅकॅ डमी,जामखेड यांचे स्थानिक मुलांसाठी डान्स अकॅडमी सुरु करुन दालन उपलब्ध करून देण्याचे काम करण काळे व सोहेल आतार यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. या डान्स अकॅडमीचे उदघाटन पंचायत समिती चे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी डान्स अकॅडमी करण काळे व सोहेल आतार यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आली असल्याचे मत माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकरयांनी व्यक्त केले. हे नक्की वाचा: दौंड भीमा नदी पत्रात…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे दौंड भीमा नदी पत्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा; वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या डोळ्यावर बांधली पैशाची पट्टी बांधली आहे का अशी शंका उपस्थित होते, येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ दौंड तालुक्याच्या पूर्व भागात म्हणजे राजेगाव आणि कर्जत तालुक्यातील खेडे येथील भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे . हा वाळू उपसा गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे नदीपात्रातील स्थानिकच्या मते तांत्रिक बोटीने मच्छीचे जाळे फाटली जात आहे , त्यामुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आली आहे वाळू तस्करांमुळे आलेली आहे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे या तस्करांचे आता चांगलेच पावले आहे असे असले…
टोयोटा कंपनीच्या दोन कार्सना बाजारात तुफान मागणी आहे. या तगड्या मागणीमुळे कंपनीने दोन्ही कार्ससाठी बुकिंग्स घेणं थांबवलं आहे. (PC : Toyota Bharat टोयोटा आणि सुझुकी या दोन कंपन्यांनी एकत्र येत हायब्रिड मॉडेल्स विकसित करून लाँच केले. या मॉडेल्सना भारतीय वाहन बाजारात तगडी डिमांड आहे. (PC : Toyota Bharat) या दोन्ही कार्सचं दमदार मायलेज हे तुफान मागणीचं प्रमुख कारण आहे. (PC : Toyota Bharat) टोयोटा हायरायडर कारचं मायलेज २७.९७ किमी प्रति लीटर इतकं आहे, तर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही कार २१.१ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. (PC : Toyota Bharat) तगड्या मायलेजमुळे ग्राहक या कार्सच्या हायब्रिड मॉडेल्सना प्राधान्य देत आहेत.…
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारभुतवडा गावचे भुमिपुत्र आबासाहेब डोके यांची पिंपरी चिंचवड येथे पोलिस म्हणून व आस्तिक डोके यांची नांदेड पोलिस म्हणून तसेच साकत गावचे भाचे नगर येथे पोलिस म्हणून कार्यरत असणारे महादेव जाधव यांची निवड झाल्याबद्दल आज रोजी जामखेड तालुक्यातील साकत येथे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अत्यंत गरीब परिस्थितीतून या सर्वांनी पोलीस भरतीची सराव अखंड चालू ठेवला होता यामधील आबासाहेब डोके याची परिस्थिती अत्यंत हालकीची असताना , फक्त आईच्या जिद्दीपोटी या मुलाने या अगोदर पण शासकीय सेवेत एक पोस्ट काढली होती पण त्याला महाराष्ट्र पोलीस ही वर्दी आपल्या अंगावर घालायची होती त्याने पहिली नौकरी…
iphone 15 हा भारतात तयार होणार आहे iphone आयफोन 14 लॉन्च होऊन काही दिवस झाले असतानाच आता आयफोन 15 याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे कारण की आयफोन iphone 15 हा भारतात तयार होणार आहे त्याच्यामुळे आयफोन iphone 15 हा कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार की नाही याची उत्सुकता पण ग्राहकांमध्ये आहे iphone 15 चे काही फोटो उपलब्ध झाले आहेत, पहिले काचेचे पॅनेल आयफोन 15 चे आहे, दुसरे प्रो मॉडेलचे आहे आणि शेवटचे आयफोन 15 प्रो मॅक्सचे आहे, यातून उघड होते की या मालिकेतील सर्व मॉडेल्स डायनॅमिक आयलंडमध्ये असतील Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार…
जय हनुमान उर्जा आणि शक्तीचे प्रतिक-हभप इंगळे महाराज नगर – भगवान हनुमान शिवाचा अवतार मानले जाणारे असून स्वत: जय हनुमान हे उर्जा आणि शक्तीचे प्रतिक मानले जातात. ते रामाचे निस्सीम भक्त होते, त्यामुळे शक्तीची देवता म्हणून देखील जय हनुमान ओळखले जातात. त्यांची मनोभावनेने पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात सुख,समृद्धी नांदते आणि सर्व संकटे, दु:ख दूर होतात, असे हभप परमेश्वर इंगळे महाराज यांनी आपल्या सुश्राव्य किर्तनातून सांगितले. नगर-औरंगाबाद रोडवरील गजराजनगर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे गावातील तरुणांनी कावडीने आणलेल्या जलाने श्री हनुमान मुर्तीस जलाभिषेक करण्यात आला. सुर्योदयाच्या सुमारास फुले, गुलाल उधळून ‘बजरंग बली कि जय’ चा नाम घोष करीत जन्मसोहळा…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे दौंड ता. खानवटे येथे दिनांक ७ “एप्रिल 2023 रोजी दुपारी दोन वाजता दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. सदरचा दरोडा हा सुदाम तातन कांबळे यांचे घरी झाला असून, विशेष म्हणजे ज्या खोलीत ऐवज रोख रक्कम आहे तीच खोली फोडली आहे कांबळे कुटुंबातील सर्वजण पुणे येथे कार्यक्रमासाठी गेले होते याचाच फायदा घेऊन याच कुटुंबाच्या संबंधातील व्यक्तीला सर्व माहिती असलेल्या व्यक्तींनी दरोड्यांसाठी मदत केली असल्याची चर्चा जोरात चालू आहे या दरोड्यात एक लाख नव्वद हजार रुपये रोख आणि अंदाज हे बारा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून दरोडेखोर दिवसाढवळा पळून जाण्यात यशस्वी झालेत घटनेच्या ठिकाणी दौंड…