Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » विजय औटीसह तिघांचे जामीन फेटाळले; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

विजय औटीसह तिघांचे जामीन फेटाळले; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

mahalokwaniBy mahalokwaniJuly 3, 2024Updated:July 3, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर : प्रतिनिधी

खासदार नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर ६ जुन रोजी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी याच्यासह प्रितेश पानमंद व मंगेेश कावरे यांचे जामीन अर्ज नगरच्या सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळले. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे विजय औटीसह इतरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.


दि.६ जुन रोजी अ‍ॅड. राहुल झावरे व इतरांची किरकोळ बाचाबाची झाली होती. त्या कारणावरून मा. नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, त्याचा भाउ माजी नगरसेवक नंदू औटी, प्रितेश पानमंद, मंगेश कावरे, अंकुश भागाजी ठुबे, नीलेश उर्फ धनू दिनकर घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव लक्ष्मण औटी, पवन बाबा औटी, प्रमोद जगन्नाथ रोहोकले, प्रथमेश दत्तात्रय रोहोकले, सुरेश अशोक औटी यांनी पारनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पारनेर पोलीसांनी विजय औटी, नंदू औटी, प्रितेश पानमंद व मंगेश कावरे यांना त्याच दिवशी अटक केली होती. पुढे न्यायालयाने त्यांना अनुक्रमे पाच व तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.


चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी नगरच्या सत्र न्ययालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जावर मंगळवारी युक्तीवाद होऊन न्यायालयाने विजय औैटी, प्रितेश पानमंद व मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. न्यायालयीन कोठडीतील नंदू औटी याचा जामीन अर्ज सादर करण्यात आला नव्हता. दरम्यान, जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने विजय औटीसह इतरांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

इतर आरोपी फरार

झावरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली असली तरी उर्वरीत आरोपी मात्र फरारच आहेत. फरार आरोपींच्या वतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्याची माहीती असून त्यांच्या अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार आहे.

नगरपंचायतीच्या गुन्हयाची टांगती तलवार

नगरपंचायतीच्या मागणी रजिष्टरमध्ये बनावट दस्तऐवज सादर करून ३५ शॉप व २५ फलॅटची नोंद करून नगरपंचायतीची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी मुख्याधिका-यांनी विजय औटी व इतरांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पारनेर पोलीसांना पत्र दिले आहे. हा गुन्हाही दाखल होण्याची टांगती तलवार विजय औटी याच्यावर असून तसे झाल्यास त्याच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. औटी पतसंस्थांच्याही रडारवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRam Shinde| रत्नदीप मेडिकल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची आ.प्रा राम शिंदेची मागणी
Next Article अहमदनगर जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने भाजल्या भाकरी, हाटल पिठलं
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.