Take a fresh look at your lifestyle.
mahalokwani

ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात पायी दिंडी चे जामखेड येथून श्री क्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान

0

जामखेड प्रतिनिधी

गेली ३१ वर्षापासून जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रसिद्ध व्यापारी माननीय दिलीप बाफना व बाफना परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येतो. ३० वर्षांपूर्वी हभप बाबा महाराज सातारकर, हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड ते पंढरपूर दिंडी सोहळा सुरू केला होता आजही हा सोहळा सुरू आहे.

bafana ad


आज रोजी सकाळी दहा वाजता जामखेड शहरातील बाफना मशिनरी येथून मोठ्या उत्साहात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडी चे श्री क्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान झाले. यावेळी हभप विक्रम बागडे (महाराज), माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठ बाफना, सिताराम राळेभात (महाराज), हभप पंढरीनाथ राजगुरू (महाराज),हभप विवेक मंजरतकर ( महाराज) ,जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप शेठ गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना, सेक्रेटरी शरद शिंगवी, अशोक शिंगवी,लखमीचंद बाफना,अभय बाफना,पिंटू शेठ बोरा,पवन राळेभात, सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी, अशोक बाफना, सुभाष भळगट,जितेंद्र बोरा,रोशन बाफना, ललित बाफना, मिथून बाफना,तुषार बोथरा आदी वारकरी उपस्थित होते.आज मंगळवार दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून जामखेड शहरात बाल वारकऱ्यांसह प्रदक्षिणा घालत प्रस्थान झाले .

daily needs

ही पायी दिंडी बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पंढरपूर येथे जाणार आहे.तरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप बाफना मित्र‌ परिवार व विठ्ठल भजनी मंडळ यांनी केले आहे.दिंडीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले आहेत.दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, पांढऱ्या पोशाखात सहभागी भाविक,भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला वारीसाठी निघाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळालेली खाती पुढिलप्रमाणे कॅप्टन कूल बद्दल तुम्हाला या गोष्टी माहितीय का ? बोल्ड फोटोशूटने प्रेग्नेंसीच्या अफवांना पूर्णविराम