Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉ. भास्कर मोरे हाय-हाय ; जामखेड येथील बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन

डॉ. भास्कर मोरे हाय-हाय ; जामखेड येथील बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन

mahalokwaniBy mahalokwaniMarch 7, 2024Updated:March 7, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे, संभाजी ब्रिगेड,मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रतिष्ठान मैदानात

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. भास्कर मोरे हाय-हाय अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. हा संस्थाचालक नेहमीच असे काही कृत्य करत आहे, याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होत आहे, या अगोदर पण या संस्था चालकांवर लैगिक छळाचा गुन्हा दाखल आहे’ त्यावेळी पण अनेक विद्यार्थीं रस्त्यावर उतरले होते. पण यावेळेस स्थानिक पत्रकारांनी अनेक बातम्या लावल्या पण ज्या वेळेस एका मुलीवर लैगिक छळ झाला होता, त्यावेळेस अशा बातम्या सर्व पत्रकारांनी लावल्या असत्या आणि पोलसांनी तत्परता दाखवली असती तर, हा संस्थाचालक जेल मध्ये दिसला असता.

यावेळी आंदोलन प्रसंगी कासुळे, जयराम रावसाहेब या विद्यार्थ्यांने आम्हाला जर जाणीवपूर्वक कमी मार्क मिळाले ( नापास झालो) तर मी काॅलेजच्या गेटला गळाफास घेऊन आत्महत्या करणार असे तहसीलदार गणेश माळी यांना सांगितले तसेच विद्यार्थी म्हणाले की, आता पुढचा मार्ग थेट पुणे विद्यापीठ येथे जाऊन न्याय मागणार.

pm muft bijli yojana| मोदी सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत वीज, यांना मिळणार याचा लाभ

दुसऱ्या दिवशी पण विद्यार्थ्यांनी आंदोलन केले यावेळी या मागण्या केल्या नियमाप्रमाणे परीक्षा फी घेण्यात यावी अतिरिक्त फी घेवू नये. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था केली असून विद्यार्थ्यांकडून ते किलोमीटर प्रमाणे पैसे घ्यावेत. गणवेश आकरणी योग्य असावी. डॉ. भास्कर मोरे आम्हा विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देतील, विद्यार्थ्यांनीना पर्सनल फोन करून धमकावणे असे विविध मागण्यासाठी दि.५मार्च रोजी दुपारी चार वाजता जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन च्या विरोधात बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेजपासून ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढला.तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन येथे तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनात एकच रोष व्यक्त करत घोषणा दिल्या.डाॅ.भास्कर मोरे हाय.., हाय ! आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करु.

डॉ. भास्कर मोरे यांच्यावर कारवाई झाली नाही तर मोरे यांच्या कॉलेजसमोर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, हवा सरनोबत, सनी सदाफुले अनिल पाटील आदी तसेच मनसेच्या वतीने विद्यार्थांच्या वतीने निवेदन देण्यातआले .यावेळी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी सांगितले की, शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.

या आंदोलना प्रसंगी प्रा. मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे,केदार रसाळ, रमेश आजबे अवधूत पवार,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुरंग भोसले, रमेश आजबे, काकासाहेब कोल्हे,सागर घुमरे,अशोक पोटफोडे, जगन्नाथ म्हेत्रे यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच या बाबत जामखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. तब्बल चार तास चालले आंदोलन हे रात्री अकरा वाजता मागे घेण्यात आले.

सदर प्रकरणी संबंधित संस्थेच्या अध्यक्ष यांना बोलावून चौकशी करण्यात येईल तसेच विद्यार्थी यांच्या
मागणीनुसार विद्यापीठाच्या कुलगुरू यांना निवेदन पाठवले जाईल

गणेश माळी (तहसीलदार, जामखेड)

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleKharda |खर्डा येथे पल्स पोलिओ लसीकरणापासून कोणी वंचित राहणार नाही; यासाठी बाजीराव गोपाळघरे यांचा पुढाकार
Next Article Women’s Day| महिला सक्षमीकरणासाठी कायदा महिलांच्या पाठीशी- प्रथम वर्ग न्यायाधीश वैभव जोशी
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.