Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Eknath Shinde vs Devendra Fadnavis | शिंदेंचा राजकीय बळी जाणार; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गेम चेंजर ठरणार

Eknath Shinde vs Devendra Fadnavis | शिंदेंचा राजकीय बळी जाणार; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गेम चेंजर ठरणार

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 4, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Eknath Shinde : जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ग प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. राज्यातील अनेक जिल्हे, तालुके बंद करत निषेध व्यक्त केला जात आहे तसेच एस टी बसेस सुद्धा बंद केल्या आहेत. अशातच आता राज्यात एकीकडे मराठा आंदोलक आक्रमक होतायेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात व्यस्त होते.. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही गैरहजर होते. याच पार्शवभूमीवर एकनाथ शिंदेच्या माथी मराठा आंदोलन प्रकरणाचं खापर फुटणार अश्या चर्चाना उधाण आलाय.. चला तर जाणून घेऊ थोडं सविस्तर..

फडणवीसांचे आदेश, Eknath Shinde यांना भोगावे लागणार

मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जालन्यातील आंदोलनकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. सरकारचा त्यांच्याशी संवाद सुरू होता आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यावर चर्चा सुद्धा सुरू होती. मराठा आरक्षणावर सरकार काम करत असून आणि हा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित विषय झाला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा एका दिवसात सुटणारा प्रश्न नाही.

तसेच जालन्यातील घटना ही खरोखर दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. लाठीचार्जमध्ये कोणीही गंभीर जखमी होऊ नये अशी प्रकारची काळजी घेण्यात आली होती. जर लाठीचार्ज झाला नसता तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

अजित पवारांमुळं Ekanth Shinde असुरक्षित

अजित पवार सरकारमध्ये आल्याने शिवसेनेच्या आमदारांची घालमेल होत असल्याचे दिसून आले, दरम्यान शिवसेनेत बंड होत असताना अजित पवार यांचंच कारण पुढे करत शिवसेनेच्या आमदारांनी टीका केली होती. मविआ सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नाही असा आरोप सातत्याने शिवसेनेच्या आमदारांनी केला होता. मात्र देवेंद्र फडणवीसांमुळं त्यांना परत अजित पवार यांच्यासोबतच काम करावं लागत आहे. तसेच राजकीय वर्तुळात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चामुळे सुद्धा Eknath Shinde आता असुरक्षित झाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा बॅकअप प्लॅन अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांचं सुप्रीम कोर्टाकडून निलंबन झालं तर महायुतीचे सरकार अल्पमतात येईल, परिणामी राज्य सरकार कोसळेल. मात्र अजित पवार सरकार मध्ये आले होते तेव्हा पत्रकारांनी १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते. सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही; 288 आमदारांपैकी जर समजा 16 आमदारांचा वेगळा निकाल लागला. तरी सरकारच्या बहुमतावर काहीच परिणाम होत नाही. कारण 16 आमदार अपात्र झाले तर आमदारांची संख्या 272 होईल. आणि बहुमताला जी संख्या हवी आहे, तो आकडा सत्ताधारी मंडळीकडे असल्याचे अजित पवार म्हणाले. Eknath Shinde जरी सत्तेतून गेले तरी अजित पवार सरकारमध्ये राहतील याच छुप्या उद्देशाने फडणवीसांनी अजित पवारांना सरकारमध्ये सोबत घेतलं.

हे ही वाचा 👉: जालना मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; राज्य सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई..

जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे राज्यात अशांतता निर्माण झाली आहे, हे उपोषण शांततेच्या मार्गानी चालू होते, असे अचानकपणे काय घडले? एवढा पोलिस बंदोबस्त त्या ठिकाणी पाठवण्यात आला? फायरिंग आदेश कोणी दिले? याची सखोल चौकशी करण्यात यावी त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खरा मास्टर माईंड उघड होईल, यामध्ये पोलीस अधीक्षकचा बळी देऊन चालणार नाही, कारण त्यांना हा आदेश कोणी दिला हे पण जनतेसमोर आले पाहिजे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticlePune weather| महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून मुसळधार पावसाचा पुणे हवामान विभागाचा अंदाज..
    Next Article Teacher Day| शिक्षक दिनादिवशीच महिला शिक्षकेवर काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने निधन..
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.