Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » अहिल्यानगर » Engineering | छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्सव २०२५ उत्साहात संपन्न
अहिल्यानगर

Engineering | छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्सव २०२५ उत्साहात संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniApril 14, 2025Updated:April 14, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी Engineering महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन ‘उत्सव २k२५’ दि. १२ एप्रिल रोजी थाटामाटात साजरे झाले. सुंदर अशा स्वागतगीताने सुरू झालेल्या या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे सकाळ वृत्तपत्र समूहाचे सहसंपादक मा. श्री. प्रकाश पाटील साहेब हे उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याविषयी मार्गदर्शन करत असताना Engineering अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शाहू, फुले, आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श आपल्यासमोर ठेवून आयुष्यामध्ये पुढील पाऊलं योग्य दिशेने कशाप्रकारे उचलावीत, याविषयी भाष्य केले. तसेच कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे मराठी सिने अभिनेते तसेच झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ मधील फेम व ईशाचे बाबा ही व्यक्तिरेखा ज्यांनी गाजवली असे मा. श्री. मोहिनीराज गटणे यांनी आपले कलाक्षेत्रातील विविध अनुभव सांगत आयुष्याकडून विद्यार्थ्यांनी नेमकं काय घ्यायला पाहिजे, याविषयी विद्यार्थ्यांना अतिशय सुचक शब्दांमध्ये भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसाद समाज संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र दरे साहेब यांनी अध्यक्षीय भाषण करत असताना संस्थेचा शैक्षणिक उद्देश स्पष्ट केला की जो महाविद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमद्ये मोलाची भर टाकेल. संस्थेचे सहसचिव मा. श्री. जयंतराव वाघ साहेब यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पारितोषिकांचे कौतुक करत पुढील वर्षी देखील विद्यार्थ्यांनी असेच विविध क्षेत्रात प्रगती करत पारितोषिके मिळवावीत, अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र चोभे, सकाळ वृत्तपत्र येथील श्री नवनाथ खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी वार्षिक अहवाल वाचन सादर केले आणि पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयामध्ये सुरू होत असलेल्या नवनवीन उपक्रमांची, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेमध्ये असणाऱ्या भरीव कामगिरीची आणि महाविद्यालयाने मागील वर्षात घेतलेल्या नवनवीन उपक्रमांची माहिती आपल्या भाषणातून सर्वांना दिली.


उत्सव २k२४ असे नाव असलेल्या या स्नेहसंमेलनामध्ये आठवड्याभरात विद्यार्थ्यांनी ग्रुप डे, बॉलीवूड डे, ट्रेडिशनल डे, मिसमॅच डे इत्यादी कार्यक्रमांचा आनंद लुटत असताना वेगवेगळ्या वेशभूषा आणि नानाविध प्रकारचे पेहराव परिधान करत कलाकुसर सादर केली. नृत्य, कलाविष्कार, नाटके, गायन आदी कला गुणांची सांगड घालत, अशा प्रकारचे महाविद्यालयीन उत्सव साजरे करण्यात गुंग असणारे विद्यार्थी अगदी भान हरपून आणि एकोप्याने विविध कलागुनांच सादरीकरण करत असतात.


याप्रसंगी सकाळच्या सत्रात बक्षीस वितरण तर दुपारच्या क्षेत्रात माजी विद्यार्थी आयोजित केला गेला होता. यावेळी प्रा. पी. जी. निकम (सिव्हील विभागप्रमुख), डॉ. एम. के. भोसले (प्रथम वर्ष समन्वयक), प्रा. एस. एम. वाळके (ई अँड टी सी विभाग प्रमुख), प्रा. ए. बी. काळे (मेकॅनिकल विभागप्रमुख), प्रा. एस. पी. विधाते (कम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख), डॉ. व्ही. व्ही. पाटील (ए.आय. विभागप्रमुख) हे देखील उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेकॅनिकल विभागाचे प्रा. अक्षय देखणे तसेच सिव्हिल विभागाच्या प्रा. वर्षा येवले यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी व सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. प्रसाद निकम सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्था स्तरावरून तसेच महाविद्यालयातील सर्वांनीच विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना मिळालेली राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय बक्षिसांचे कौतुक केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBajaj bike | बजाज ऑटोने 2025 मध्ये काही नवीन बाइक्स लाँच केल्या; पहा सर्व गाड्यांची किंमत
Next Article devendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोफत वीजेसंदर्भात मोठी घोषणा; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
mahalokwani
  • Website

Related Posts

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

June 15, 2025

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

June 9, 2025

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

May 31, 2025

Ahilyanagar| तलाठी आणि कॉलेज तरुणीचा एकत्र मृत्यू: अहिल्यानगर जिल्हा हादरला

jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.