Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Gujarat| 200 कोटीची संपत्ती दान; हातात घेतला कटोरा, कारण काय ?

Gujarat| 200 कोटीची संपत्ती दान; हातात घेतला कटोरा, कारण काय ?

mahalokwaniBy mahalokwaniApril 16, 2024Updated:April 16, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कुणाच्या आयुष्याला कधी टर्निंग पॉइंट मिळेल काही सांगता येत नाही. कालपर्यंत रंगारंग पार्टी, आलिशान घर, कार, परदेशवारी असं आयुष्य जगणाऱ्या एका जोडप्याने अचानक संन्यासी होण्याची निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी त्यांची 200 कोटी रुपयांची संपत्तीदान करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील हा मोठा व्यावसायिक आहे.

Gujrat | 200 कोटीची संपत्ती दान

गुजरातमधील Gujarat एका कंन्स्ट्रक्शन बिझनेसमन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भावेश भाई भंडारी असं या उद्योजकाचं नाव आहे. त्याने 200 कोटीची संपत्ती दान करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अखेर त्यांनी ही संपत्ती दान केली आहे. तसेच पत्नीसोबत संन्यास दीक्षा घेणार आहेत. लग्झरी आयुष्य जगणारे भावेशभाई आणि त्यांची पत्नी आता एका हातात कटोरा घेऊन भिक्षा मागून खाणार आहेत. जवळ फक्त दोन जोडी कपडे ठेवणार असून जमिनीवर झोपणार आहेत.

भावेशभाई भंडारी यांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी दान केली आहे. ही पुंजी थोडी थोडकी नसून 200 कोटीची आहे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने संपत्ती दान करून संन्यास दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपत्ती दान केली आहे. आयुष्यभर लग्झरी आयुष्य उपभोगणारं हे दाम्पत्य आता पंख्याशिवाय, कुल, एसी शिवाय राहणार आहेत. जमिनीवर झोपणार आहेत. पायी चालणार आहेत आणि लोकांकडून भिक्षा मागून त्यावर पुढील आयुष्य घालवणार आहेत.

Table of Contents

  • Gujrat | 200 कोटीची संपत्ती दान

भंडारी हे गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगरमध्ये राहतात. अहमदाबादसह संपूर्ण गुजरातमध्ये त्यांचा बिझनेस फैलावलेला आहे. भावेशभाई त्यांच्या कुटुंबासोबत चांगलं आयुष्य जगत होते. पण आता त्यांना संन्यासी बनून देवाची आराधना करायची आहे. त्यामुळे त्यांनी पत्नीशी विचारविनिमय केला आणि संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. ते जैन संन्यासी झाले आहेत. त्यांची पत्नीही संन्यासी झाली आहे. भावेश यांचं कुटुंब जैन मुनिंशी नेहमी जोडलेलं होतं.

हिम्मतनगरमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात भंडारी दाम्पत्याने 200 कोटीची संपत्ती दान केली. त्यानंतर त्यांनी जैन संन्यासी बनण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासोबत 35 लोकांनी संन्यासी होण्याची इच्छा व्यक्त केली. 22 एप्रिल रोजी त्यांना जैन संन्यासी होण्याची दीक्षा दिली जाणार आहे.

मुलं आधीच संन्यासी झाले

भावेशभाईंच्या मुलांनी आधीच संन्यास घेतला आहे. 2022 मध्ये त्यांच्या 16 वर्षाच्या मुलाने आणि 19 वर्षाच्या मुलीने संन्यास घेतला. आता दोघा पती पत्नीनेही मुलांच्याच मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जमिनीवर झोपणार

जैन साधूंची तपस्या अत्यंत कठिण असते. जैन साधू कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रीक वस्तूंचा वापर करत नाहीत. ते पंख्याची हवा सुद्धा घेत नाहीत. जमिनीवर चटाई टाकून किंवा लाकडाच्या फळीवर ते झोपतात. पायी चालतात आणि भिक्षा मागून खातात.

का घेतला निर्णय ?

भावेशभाई यांनी संन्यासी होण्याचा निर्णय का घेतला याची माहिती दिली आहे. आपल्या मुलांपासून प्रेरणा घेऊनच संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला. मुलांनीही भौतिक आसक्तींचा त्याग करून तपाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचं भावेशभाई म्हणतात. साधू झाल्यावर त्यांच्याकडे जेवणासाठी एक कटोरा असेल. तसेच दोन सफेद वस्त्रे असतील. एक सफेद झाडू असेल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleshevgaon |शेअर मार्केटने लावला शेवगावकरांना चुना; इतक्या कोटीला झोपला तालुका
Next Article Nilesh lanke| विखें कार्यकर्त्यांचा वापर कढीपत्त्या सारखा करतात; निलेश लंके यांचा विखेंवर हल्लाबोल
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.