जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड Jamkhed शहरातील श्री. शनी मारुती मंदिर येथे प्रत्येक शनिवारी मंदिर समिती व भक्त मंडळी च्या वतीने सायंकाळी ७ वा आरतीचे नियोजन करण्यात येत असून मारुतीची मूर्ती व गाभाऱ्याला आकर्षक लाल गुलाबची सजावट करण्यात आली असून दोन्ही गाभारे लाल रंगाने न्हाऊन निघाले आहेत .
हे नक्की वाचा Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम…
Jamkhed| जामखेड शनी- मारुती
या काळात मंदिर समितीने कधी तुळशीच्या तर कधी शेवंतीच्या फुलांनी तर गलांडा ची फुलांनी गाभाऱ्याची सजावट केली होती . लाल गुलाब हव्या त्या संख्येत मिळत नसल्याने अखेर मंदिर समितीने अनेक ठिकाणाहून हे गुलाब मागवून आज देवाच्या गाभाऱ्यात हि लाल गुलाबाची सजावट केली आहे .
[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]
यावेळी मनसेचे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, नगरसेवक अमित चिंतामणी,अटकरे सर, कपिल राऊत,सनि सिध्देश्वर, जगन्नाथ म्हेत्रे, आकाश पिंपळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाल गुलाबात मारुती रायाचे अनोखे रूप खुलून दिसत असून देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे . जामखेड Jamkhed शहरातील स्थानिक कलाकार ओम सिध्देश्वर यांनी ३ तास राबून हि आकर्षक सजावट पूर्ण केली आहे.
