Maratha Reservation : जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे काल (शुक्रवार) मराठा आरक्षण (Maratha Reservation )आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार झाला. या घटनेत अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले. या प्रकरणात राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान जालना शहरात जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कालच्या प्रकारानंतर जालना येथे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. शहरातील अंबड चौफुली येथे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी ट्रक देखील जाळली. तसेच पत्रकारांनाही रोखले. या दरम्यान आंदोलकांचा जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दाखल झाले आहेत.

▶ असा घडला घटनाक्रम
• दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान ३०० ते ३५० पोलिसांचा फौजफाटा आंदोलन स्थळ दाखल.
• दुपारी चार वाजेच्या दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक राहूल खाडे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी आंदोलनाशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले. मात्र, तोडगा निघाला नाही.
• थोड्यावेळाने पुन्हा पोलिस चर्चेसाठी गेले.
• आंदोलनस्थळी एक ते दीड हजार जमावाला पोलिसांनी घेरावा घातला.
• साडेचार ते पावणेपाच वाजेच्या दरम्यान पोलिस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची सुरू होऊन धक्काबुक्की झाली
• पाच ते साडे पाच वाजेच्या दरम्यान नागरिक व पोलिसांमध्ये हाणामारी. नागरिकांकडून जबर दगड फेक
• पोलिसांकडून लाठीजार्च सह प्लास्टिक बुलेट, अश्रुधुराचा मारा केला.
•जमाव सैरवैर
Jalna | जालना घटनेचा निषेध; आमच्या आंदोलन कर्त्या आई बहीण वर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध
▶ जालन्यातील घटनेचे (Maratha Reservation) राज्यभरात पडसाद
जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन (Maratha Reservation) करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सरपंचांनी स्वतःचीच गाडी पेटवली. फुलंब्रीचा सरपंच मंगेश साबळे यांनी हा प्रकार केला. भर रस्त्यात गाडी आडवी लावत पेट्रोल टाकून गाडी त्यांनी पेटवून दिली. आंतरवाली गावात झालेल्या लाठीचार्जच्या निषेध म्हणून त्यांनी हे टोकाचे पाऊल उललले.
Opposition parties criticised the #MahaYuti government over lathi charge by the police on the participants in an agitation in Jalna district of Maharashtra demanding #MarathaReservation @CMOMaharashtra @HWNewsEnglish pic.twitter.com/WAXmXRf6jn
— Sanjay Jog (@SanjayJog7) September 1, 2023
▶ महाराष्ट्र बंदची हाक
आता मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती (Maratha Reservation) मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याआधी आज राज्यभरातल्या मराठा समन्वयकांची बैठक होणार आहे. होणाऱ्या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली जाणार अशी माहिती समोर आलीये.
