Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड » जामखेडमध्ये आंबेडकर जयंती शिस्तबद्ध आणि शांततेत साजरी करावी – पोलीस निरीक्षकांचा संदेश
जामखेड

जामखेडमध्ये आंबेडकर जयंती शिस्तबद्ध आणि शांततेत साजरी करावी – पोलीस निरीक्षकांचा संदेश

mahalokwaniBy mahalokwaniApril 12, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

जामखेड | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुशासनात आणि शांततेत साजरी व्हावी, यासाठी जामखेड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली. शहरातील विविध सामाजिक संघटना, भिमसैनिक, पोलीस व नगरपरिषद अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की,मिरवणुकीत फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच फोटो वापरण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, जुन्या घटनांचे भडक संदर्भ, आक्षेपार्ह पोस्टर यावर कठोर कारवाईचा इशारा दिला.


सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी डिजेचा आवाज नियंत्रित ठेवणे, लेझर लाइट्स न वापरणे आणि महिलांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीत प्रा. मधुकर राळेभात, ॲड.डॉ.अरुण जाधव, संध्या सोनवणे, प्रदीप टापरे, प्राचार्य विकी घायतडक, बापूसाहेब गायकवाड, मोहन पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, जामखेड नगर परिषदेचे आरोग्य विभाग चे तुषार केवडे, लक्ष्मण माने,भाजपा जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, नगरसेवक मोहन पवार,प्राचार्य विकी घायतडक, नगरसेवक दिगांबर चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे युवक अध्यक्ष काका राळेभात, भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात,आनंद सदाफुले,राणा सदाफुले,दिपक घायतडक,विकी गायकवाड,मनिष घायतडक,आकिब आतार,आतिष मेघडंबर, राम गायकवाड आदी भिमसैनिक व मान्यवर उपस्थित होते पोलीस नाईक अविनाश ढेरे यांनी या बैठकीचे नियोजन केले.

पोलीस प्रशासनाच्या सूचना

  1. महिलांशी छेडछाड होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
  2. ध्वनी प्रदूषण टाळावे. डिजे आवाजाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  3. लेझर सिस्टीम व लाइट्स वापरू नयेत – ते डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात.
  4. प्रतिमा पूजन ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी.
  5. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
  6. सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान किंवा वादग्रस्त फॉरवर्ड करू नयेत.
  7. जुन्या घटनांचा संदर्भ देत आक्षेपार्ह पोस्टर्स टाकू नयेत.
  8. मिरवणुकीचे मार्ग निश्चित पाळावेत.
  9. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार, जसे की कपडे काढणे, टाळावे.

सर्वांनी सहकार्य करून शांतता आणि शिस्तीने उत्सव साजरा करावा.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlesatbara | आता घरबसल्या मिळावा जमिनीचा सातबारा,फेरफार,नकाशे! राज्य सरकारचा मोठा निर्णय
Next Article dharavi| धारावीकरांसाठी गुडन्यूज, आता दोन मजली घरे मिळणार, अट फक्त एकच…
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

December 5, 2025

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

November 18, 2025

jamkhed nagarparishad | पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर; उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट

October 8, 2025

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.