Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » jamkhed| जामखेड येथील नाथ नगर येथे होळी महोत्सव उत्साहात साजरा

jamkhed| जामखेड येथील नाथ नगर येथे होळी महोत्सव उत्साहात साजरा

mahalokwaniBy mahalokwaniMarch 26, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांची शैक्षणिक चळवळ सुरू करावी – ॲड. डॉ. अरुण जाधव

जामखेड प्रतिनिधी

समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी व्यसन,अज्ञान ,तंटा व चुकीच्या परंपरेला फाटा देत समाजातील शिकणाऱ्या मुलांना होळी महोत्सवा निमित्त परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांची शैक्षणिक चळवळ सुरू करून हा नवीन पायंडा सुरू करावा. असे होळी महोत्सव प्रसंगी ॲड डॉ अरुण जाधव बोलत होते.

आज दि.२४ मार्च २०२४ रोजी जामखेड jamkhed शहरातील तपनेश्वर रोड येथील नाथनगर येथे नाथपंथी डवरी गोसावी समाज्याच्या वतीने होळी चे आयोजन करण्यात आले होते.जामखेड jamkhed तालुक्यात नाथपंथी डवरी गोसावी समाज गेल्या ७० वर्षा पासून राहतो. हा समाज वर्षभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करतो. होळी सणा निमित्त हा समाज एकत्र येतो. ग्रामीण विकास केंद्र संचलित, माय लेकरू प्रकल्पाच्या वतीने मुलांना ॲड डॉ अरुण जाधव यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.

पुढे बोलताना जाधव म्हणाले,समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी समाजातील नेतृत्व करणाऱ्या माणसाने समाजातील माणसाच्या हाताला धरून परिवर्तन करण्याची गरज आहे. तसेच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. समाज एकत्रित करून समाजातील नेत्यांनी प्रबोधन करून दिशा देण्याचे काम करावे. यावेळी प्रा.कैलास माने म्हणाले की,तरुणांनी एकत्र येत रूढी, परंपरेतून परिवर्तन करणे गरजेचे आहे.यातून समाजातील पुढील पिढी आदर्श निर्माण करेल. लहान मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शैक्षणिक चळवळ सुरू करावी.

भटक्या जमातींना एकत्र आणण्याचे कार्य ॲड डॉ अरुण जाधव यांनी केले.होळी या सणानिमित्त सर्व भटका समाज आपले हेवे – दावे विसरून एकत्र येतात हे उल्लेखनीय आहे. उत्तम सावंत म्हणाले की,प्रत्येक वेळी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या हक्क अधिकारासाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲड .डॉ.अरुण जाधव हे आहेत आपल्या भटक्या समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.यावेळी मोहन पवार,संपत राळेभात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.व होळी सणा निमित्त शुभेच्छा दिल्या.

जामखेड येथील नाथपंथी डवरी गोसावी समाज एकत्र करण्याचे काम आकाश शेगर, राजु शिंदे, सागर चव्हाण, अजिनाथ शिंदे, संतोष शेगर, संतोष चव्हाण यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी ॲड डॉ अरुण जाधव,प्रा. संपत राळेभात, मोहन पवार,उत्तम सावंत, संदीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवार,फुलाबाई शेगर ,रुक्साना पठाण, मोहन चव्हाण,अशोक शिंदे (करमाळा), अण्णा मोरे,आकाश पिंपळे,संतोष शेगर,दया चव्हाण जयप्रकाश शेगर ,विष्णू चव्हाण आदी माहिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकाश शेगर, राजु शिंदे, साहिल चौगुले, विशाल शिंदे, कुशाल शेगर, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार आकाश शेगर यांनी मानले.

   
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlejamkhed | विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
Next Article ram shinde vs rohit pawar| जामखेड विहिरी प्रकरणात सावळा गोंधळ; शिंदे अन् पवार कार्यकर्त्यांमध्ये सोशल वार
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.