Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Maharashtra| महाराष्ट्रात पहिल्यांदाच भटक्या विमुक्त जमातीसाठी कृती आराखडा तयार.!

Maharashtra| महाराष्ट्रात पहिल्यांदाच भटक्या विमुक्त जमातीसाठी कृती आराखडा तयार.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शासन या घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे परंतु अद्यापही या समूहातील बहुसंख्य लोक शासकीय योजनेपासून वंचित आहेत ही बाब विचारात घेऊन भटक्या व विमुक्त समाजातील जमातीच्या कल्याणासाठी आराखडा तयार करण्याकरता भटक्या व विमुक्त जमाती जिल्हास्तरीय कल्याण समितीच्या वतीने कार्यकर्ता बैठक मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३/५/२०२३ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत खालील विषयावर सखोल चर्चा झाली

अहमदनगर जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जात प्रमाणपत्र , रेशन कार्ड , मतदान कार्ड , शंभर टक्के शालेय प्रवेश , तालुक्यातील समिती स्थापन करणे , आरोग्य विषयक सुविधा , ऊसतोड कामगार ओळखपत्र वाटप करणे , महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत उपलब्ध सुविधा , वसंतराव नाईक तंटा वस्ती सुधार योजना , यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना , धनगर समाज घरकुल योजना , घरकुलासाठी जागा खरेदी योजना , बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे , गायरान जमिनीत बांधलेले घरकुल नियमानुकुल करणे अशा प्रकारे विमुक्त जाती व भटक्या जमाती च्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला .आणि या योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा यावर सखोल चर्चा झाली.

हा कृती आराखडा तयार करताना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर चे श्री राधाकिसन देवढे साहेब, समाज कल्याण समितीचे जिल्हा सदस्य ॲड. डॉ. अरुण जाधव, समाज कल्याणचे निरीक्षक व्ही. डी. लाड, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू मोहोळ, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे समन्वयक संतोष भोसले, ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्या लता सावंत, उज्वला मदने, व एम ट्रस्टचे संदीप कुंभार, किरण सूर्यवंशी, छाया नवले आदी शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच महाराष्ट्रात (maharashtra) भटक्या विमुक्त जमाती जिल्हास्तरीय कल्याण समितीच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशिर्डी|कोते दाम्पत्याचा अनोखा उपक्रम फक्त 1 रुपयात होतो विवाह सोहळा संपन्न; सोबत मिळतात संसार उपयोगी या वस्तू.!
Next Article जामखेड तालुक्यात प्रा. सचिन गायवळ सर यांच्या भोवतीच फिरणार येणाऱ्या निवडणुकांचे चक्र.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.