Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शिर्डी|कोते दाम्पत्याचा अनोखा उपक्रम फक्त 1 रुपयात होतो विवाह सोहळा संपन्न; सोबत मिळतात संसार उपयोगी या वस्तू.!

शिर्डी|कोते दाम्पत्याचा अनोखा उपक्रम फक्त 1 रुपयात होतो विवाह सोहळा संपन्न; सोबत मिळतात संसार उपयोगी या वस्तू.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 3, 2023Updated:May 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सबका मालिक एक’, ‘श्रद्धा-सबुरी’ आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ४० हिंदू आणि २१ बौद्ध अशी ६१ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे २३ वे वर्ष असून आजतागायत कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याने २१०० मुलींचे कन्यादान केले आहे. विशेष म्हणजे कोते दाम्पत्याने स्वतःला मुलगी नसताना २१०० मुलींचे कन्यादान केले. महागाईच्या काळात फक्त एक रुपयात विवाह होत असल्याने यावर्षी विदर्भातील ४० तर एकूण ६१ जोडपी विवाह बंधनात अडकली.

हे नक्की वाचा : पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले

शिर्डीतील कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याला मुलगी नसल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचा निश्चय केला आहेय. गेल्या २३ वर्षांपासून कोते यांच्याकडून शिर्डीत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. अवघा एक रुपया शुल्क भरून या विवाह सोहळ्यात नोंदणी करता येते. कोते दाम्पत्याकडून वधू-वरांना नवे पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते. यावर्षी ६१ जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

कोते दाम्पत्याने गेल्या २३ वर्षांपासून सुरू केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात शिर्डीचे आमदार तथा राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागोतोत्सुक म्हणून जबाबदारी पार पाडतात. कोते दाम्पत्याने सुरू केलेला हा उपक्रम सामाजिक चळवळ बनली असून सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

ज्यांचा विवाह याठिकाणी पार पडला त्यांच्या अपेक्षेपेक्षाही छान नियोजन करण्यात आल्याने वधू – वरही समाधानी होते. तर कोते दाम्पत्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आशीर्वादाने संसासारची सुरुवात होत असल्याने वधू – वरांना आनंद झाल्याचे दिसून आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये सर्व धर्मासाठी शतावधान पहिल्यांदाच संपन्न; साध्वी प.पू.प्रफुलाजी यांची प्रमुख उपस्थिती.!
Next Article Maharashtra| महाराष्ट्रात पहिल्यांदाच भटक्या विमुक्त जमातीसाठी कृती आराखडा तयार.!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.