Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » Massajog| मस्साजोग मध्ये जाऊन शरद पवार यांनी दिला हा इशारा..!

Massajog| मस्साजोग मध्ये जाऊन शरद पवार यांनी दिला हा इशारा..!

mahalokwaniBy mahalokwaniDecember 21, 2024Updated:December 21, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील Massajog सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या घटनेच्या खोलात गेले पाहिजे. या घटनेमागचा सूत्रधार कोण, हे तात्काळ शोधून काढलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते मस्साजोगमध्ये बोलत होते

.Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; या तारखेला जमा होणार डिसेंबरचा हप्ता

Massajog| मस्साजोग मध्ये जाऊन शरद पवार यांनी दिला हा इशारा..!

शरद पवारांनी मस्साजोगमध्ये Massajog सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावर त्यांनी बीडमध्ये ही गोष्ट घडतेय. ती बरोबर नाही. न्याय मिळाला पाहिजे. दुखात आपण सर्व आहोत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

राज्य आणि केंद्राने याची नोंद घ्यायला हवी
“जे घडलं ते योग्य नाही. वाद विवादापासून दूर राहणारा आणि संवाद साधणारा लोकप्रतिनिधी म्हणून तो काम करतो. जे घडलं त्याचा काही संबंध नाही. त्याला दमदाटी दिली. त्याची चौकशी केली. चौकशी का करतो म्हणून बाहेर न्यायचं आणि हल्ला करायचं. आणि हल्ला हत्येपर्यंत जातं. हे चित्र गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्राने घ्यायला पाहिजे. दोन चार दिवस पाहत आहोत. बजरंग सोनावणे आणि तर खासदार महाराष्ट्रातील हा प्रश्न संसदेत उचलून धरला. न्याय द्या असा आग्रह धरला.” असे शरद पवारांनी म्हटले.

Table of Contents

    दुखणं मांडणं मांडण्याचा प्रयत्न केला
    “बजरंग सोनावणे यांचं भाषण ऐकलं. देशाच्या राज्यात काय चाललंय हे खासदारांनी ऐकलं. सूत्रधार पकडला पाहिजे असं सोनावणे यांनी सांगितलं. आरोपीचे जे संवाद कुणाबरोबर झाले. त्याची माहिती काढली पाहिजे आणि त्याच्या खोलात गेले पाहिजे. अशी मागणी सोनावणे आणि लंके यांनी धरला. आता महाराष्ट्रातील विधानसभेत बीडचे आमदार क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांनीही हा प्रश्न मांडला. कोणत्या समाजाचे आणि कोणत्या जातीचे आहेत हा विचार केला नाही. अन्याय झाला , त्यामुळे दुखणं मांडणं मांडण्याचा प्रयत्न केला”, असेही शरद पवार म्हणाले.

    राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही
    “रक्कम दिली मदत होईल. पण गेलेला माणूस येत नाही. मदत दिली तरी कुटुंबाचं दुख जाणार नाही. आम्ही त्यावर टीका करत नाही. पण जोपर्यंत याच्या खोलात जाऊन चौकशी करा. सूत्रधार जे आहेत. त्याला तातडीने धडा शिकवला पाहिजे. इथल्या वकिलांनी लेखी निवेदन दिलं त्याचा आनंद आहे. इथले वकील जबाबदारी घ्यायला तयार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी तुमचे हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडे पाहत आहे.

    Massajog या गावात दहशतीचे वातावरण आहे. कृपा करा दहशतीतून बाहेर पडा. आपण सर्व मिळून तोंड देऊ. एकदा सामुदायिकपणे उभं राहिल्यावर कोणी आपल्याला आडवू शकत नाही. बीडमध्ये ही गोष्ट घडतेय. ही गोष्ट बरोबर नाही. न्याय मिळाला पाहिजे. दुखात आपण सर्व आहोत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असा इशाराही शरद पवारांनी दिला.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articlejamkhed school | जामखेड मधील हि शाळा खेळतेय विध्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ..!
    Next Article crime walmik karad | वाल्मिक कराडवर एकट्या परळीत इतके गुन्हे, वाचा गुन्ह्यांची यादी
    mahalokwani
    • Website

    ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर; जुलै महिन्याचे पैसे या दिवशी मिळणार!

    vidhan bhavan| भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी.आश्चर्य नको

    Tesla Model Y| मुंबईत Tesla चं भारतातील पहिलं एक्सपीरियन्स सेंटर ; हे आहेत बेस्ट फीचर्स

    tukda bandi | काय आहे तुकडाबंदी कायद्या 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी मिळणार; जाणून घ्या

    nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

    Splendor बाईकवर जबरदस्त ऑफर! EMI फक्त ₹2225 पासून!”

    sangram jagtap | अहिल्यानगरमध्ये खळबळ आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

    coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं?

    new car| कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 10 लाखांपेक्षा स्वस्त कार लवकरच लाँच होणार, जाणून घ्या

    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.