MIDC Karjat-Jamkhed| कर्जत जामखेड रास्तारोको आंदोलन
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन देऊन ही बैठक घेतली नाही , यामुळे आमदार रोहित पवार यांचे समर्थक आक्रमक झाले असून आज रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी ११.०० वाजता मोठ्या संख्येने रास्तारोको आंदोलन केले आहे.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी खर्डा चौक येथे आंदोलन प्रसंगी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना घोषणा दिल्या.यामध्ये ” युवकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडण्यासाठी, जनतेचे व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आपण १३ खात्याचे मंत्री असताना एम आय डी सी MIDC साठी काय केले याचे उत्तर द्या मगच एमआयडीसीला आडकाठी आणा असा सवाल आंदोलन कर्त्यांनी आ. राम शिंदेंचे नाव न घेता टिका केली.

तसेच जर लवकरात लवकर एम आय डी सी MIDC मंजुर झाली नाहीतर पुढचे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
Jamkhed | शिक्षण विभागाचा पुन्हा दणका! जामखेड महाविद्यालयासाठी घेतला हा सर्वात मोठा निर्णय..

रास्तारोको आंदोलना दरम्यान बराच वेळ शहरातील ट्राफिक जाम झाले होते. यावेळी आंदोलकांनी ” कोण म्हणतं देत नाही , घेतल्या शिवाय रहाणार नाही. एमआयडीसी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, आशा घोषणांनी शहर दुमदुमून गेला. या आंदोलनास संभाजी ब्रिगेडनी देखील पाठींबा दिला होता.
या रास्तारोको आंदोलन प्रसंगी महिलाही उपस्थित होत्या.

Table of Contents
यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले की, आज आम्ही शासनाला भांडलो नाहीत तर, पुढील युवा पिढी आम्हाला आयुष्य भर माफ करणार नाही. आढळगाव जामखेड रोड, नगर सोलापूर रोड, करमाळा इतर नॅशनल हायवे च्या मध्यवर्ती ठिकाणी खंडाळा एमआयडीसी midc असल्याने व टाटा उद्योग, अदानी, अंबानी, सायरस पुनावाला यांसारखे मोठ मोठी उद्योगपती आ. रोहित पवार व शरद पवार यांचे ऐकतात. त्यामुळे एमआयडीसी आली तर कर्जत जामखेड मतदारसंघातील जवळपास पंधराहजार युवकांना नौकरऱ्या मिळणार आहेत. त्यामुळे कर्जत जामखेड मध्ये एम आय डी सी झाली पाहिजे. असे मनोगत या वेळी व्यक्त केले.

आमदार रोहित पवार यांनी भरपावसात मुंबई येथे विधानसभा भवनासमोर उपोषण केले तसेच आमदार पवारांची भुमिका जनतेच्या हितासाठी असून विरोधकांना पोटशूळ उठला होता,एम आय डी सीला विरोध केला ,एम आय डी सी MIDC प्रश्न आमदार रोहित पवार यांनी जनतेसाठी, युवकांसाठी हाती घेतला असून १० वर्ष प्रा राम शिंदे आमदार तसेच पालकमंत्री होते, ८ ते १० खात्याचे मंत्री होते, त्यावेळी हा प्रश्न सुचला नाही असा खोचक टीका माजी सभापती सुर्यकांत मोरे यांनी केली.

या आंदोलना प्रसंगी जेष्ठ नेते वैजिनाथ पोले,माजी सरपंच नरेंद्र जाधव, मंगेश आजबे, सुधीर राळेभात, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे,अमर चाऊस , नगरसेविका विद्याताई वाव्हळ आदींनी भाषणातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब सावंत, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, संचालक प्रकाश सदाफुले,दत्तात्रय वारे, सुधीर राळेभात, सुर्यकांत मोरे, शहाजी राळेभात,
शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमर कुरेशी, सरचिटणीस प्रकाश काळे, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, नगराध्यक्ष निखिल घायतडक, दिगांबर चव्हाण,मोहन पवार,पवन राळेभात, प्रा राहुल आहिरे सर, युवा नेते महेंद्र राळेभात, प्रवीण उगले, महेश राळेभात,बबन तुपेरे,विश्वनाथ राऊत,शरद शिंदे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, मंगेश आजबे,रमेश आजबे, ॲड.हर्षल डोके, अनिल बाबर , माजी सरपंच नरेंद्र जाधव, बापूसाहेब कार्ले, काकासाहेब कोल्हे,माजी सरपंच समीरभाई पठाण गणेश चव्हाण,ॲड ऋषिकेश डूचे,राहुल बेदमुथा,नारायण जायभाय ,
सतीश शिंदे विठ्ठल चव्हाण,काका चव्हाण,पिंटू बोरा ,माजी सरपंच समीर पठाण, बापू कारले ,हरिभाऊ आजबे,डॉ.चंद्रशेखर नरसाळे, कुंडल राळेभात, गणेश हगवणे, वसिम सय्यद,अरुण गाडेकर,सतीश चव्हाण,शशिकांत देवकर,आसिफ शेख ,कांतीलाल वाळूंजकर,अन्सार पठाण,श्रीकांत लोखंडे,प्रशांत वारे,नानासाहेब शेळके,रविराज गायकवाड,सरपंच बाळासाहेब खैरे,युवराज उगले,महादेव उगले,प्रल्हाद गिते,अविनाश पठाडे,इरफान शेख,रिजवान शेख,अशोक पठाडे,
अक्षय वाळूंजकर,दत्ता भाकरे,शुभम कोहकळे ,बिलाल शेख ,दत्ता डीसले,संदीप गायकवाड,अमर चाऊस,सागर पवार,निलेश पवार,मदन लेकूरवाळे,शरद ढवळे,शहाजी गाडे,महादेव डीसले,दीपक नेटके,घनश्याम अडाले,चंद्रकांत मोरे,सचिन शिंदे , अमोल लोहकरे तसेच नगरसेविका विद्याताई वाव्हळ, वैशालीताई शिंदे, स्मिता गुलाठी, रंजना पवार, अनुष्का वारे,प्रिती सदाफुले, शुभांगी नन्नवरे,अनुराधा अडाले,तरनुम शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

या रास्तारोको आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब सावंत यांनी पाठिंबा दिला
