Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh Lanke। खासदार लंकेंनी पालकमंत्री विखेंचा शब्द पाळला; अखेर जनआक्रोश आंदोलन स्थगित

Nilesh Lanke। खासदार लंकेंनी पालकमंत्री विखेंचा शब्द पाळला; अखेर जनआक्रोश आंदोलन स्थगित

mahalokwaniBy mahalokwaniJuly 8, 2024Updated:July 8, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

खासदार नीलेश लंके Nilesh lanke यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन सुरू होते. आंदोलकांनी पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी हमीभावाचे आश्वासन द्यावे, अशी मागणी केली होती.

यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांनी नीलेश लंकेNilesh lanke यांना भेटण्याची आपली तयारी असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या काही आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित केले गेले आहे.

Nilesh lanke| पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर खासदार नीलेश लंकेचे आंदोलन स्थगित

तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनस्थळी रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व मंत्र्यांना लंके यांनी वेळ द्यावा असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. त्यांत आंदोलन मागे घेण्यात आले.

लंकेंच्या मागणीशी सहमत : मंत्री विखे
दुधाच्या दरासंदर्भात मी सभागृहात निवेदन केले असून आता त्यासाठी पुन्हा मी बाहेर निवेदन करणे योग्य ठरणारे नाही. असे असले तरी या संदर्भात सभागृहात काही फेरविचार करण्याबाबत विचार करू असे ते म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, की याबाबाबत जे काही निर्णय आहेत ते एका दिवसात घेता येणार नाहीत. खासगी दूध संघाने संकलन बंद केल्यास अनेक अडचणी येऊ शकतात.

आंदोलनकर्त्यांच्या मागणीशी सरकार सहमत असून मागण्या पूर्ण करण्यासाठी थोडावेळ लागणार आहे व तितका वेळ खासदारांनी दिला पाहिजे अशी विनंती विखे पाटील यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केली.

खा. लंके काय म्हणाले..
खा. निलेश लंके यावेळी बोलतांना म्हणाले की, मंत्री महोदयांनी आंदोलनकर्त्यांकडे वेळ मागितली असून यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आम्हाला समजतायेत. अधिवेशन सुरू असल्याने तुम्हाला पण थेट आज काही घोषणा करता येणार नाही हे आम्ही समजू शकतो.

तसेच अनुदान देण्यापेक्षा दुधालाच भाव वाढून दिला पाहिजे व दूध भेसळ रोखली पाहिजे असेही लंके म्हणाले. दरम्यान त्यांनी विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन थांबवले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNilesh lanke|खासदारीची शपथ घेताच; खा.निलेश लंके शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर
Next Article खा. लंके यांच्या आंदोलनात भ्रष्ट पोलिसांच्या तक्रारींचा पाऊस !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.