Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh Lanke| आ. निलेश लंकेचा शब्द जामखेडकरांनी पाळला; अखेर मोरेच्या विरोधातील आमरण उपोषण स्थगित

Nilesh Lanke| आ. निलेश लंकेचा शब्द जामखेडकरांनी पाळला; अखेर मोरेच्या विरोधातील आमरण उपोषण स्थगित

mahalokwaniBy mahalokwaniMarch 15, 2024Updated:March 15, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड येथे गेली ११ दिवस विद्यार्थ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा म्हणून ९ दिवसांपासून शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुरंग भोसलेंनी सुरू केलेले अमरण उपोषण आज दि. १५ मार्च रोजी सायंकाळी पारनेरचे आमदार निलेश लंके Nilesh Lanke यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन स्थगित करण्यात आले.

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

Nilesh Lanke| आ. निलेश लंकेचा शब्द जामखेडकरांनी पाळला

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे bhaskar more हा विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व अर्थिक पिळवणूक करत असलेल्या कारणावरून दि. ५ मार्च रोजी कॉलेजच्या विद्यार्थीनी व विद्यार्थी मिळून २६८ जणांनी केलेले अंदोलनास पाठींबा म्हणून पांडुरंग भोसले यांनी दि.७ रोजी अमरण उपोषण सुरू केल्याने अंदोलनाची तिव्रता वाढली. त्यामुळे दरम्यानच्या काळात विविध पक्षसंघटनांनी दिलेला पाठिंबा, आमदार रोहीत पवार व आमदार राम शिंदे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व विद्यापीठे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठपुरावा करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची घेतलेली भूमिका या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने तसेच मेडिकल कॉलेजचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर दाखल विनयभंगाच्या गुन्हात त्याला अटक केल्याने आज दि. १५ मार्च रोजी पारनेरचे आ. निलेश लंके Nilesh Lanke यांच्या हस्ते लिंबू शरबत देऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Table of Contents

Nilesh Lanke| आ. निलेश लंकेचा शब्द जामखेडकरांनी पाळला
पांडुरंग भोसले

आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रशासनाकडे व शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

मी ही काही वेळातच विद्यापीठ प्रशासन, संबंधित मंत्री महोदय यांना माझे पत्र देत आहे. जर सर्व प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन नगर येथे करू त्या अंदोलनाची जबाबदारी माझी राहील. विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी पांडुरंग भोसले यांनी आंदोलन केले व आंदोलनास यश आले. माझेही तसेच काम आहे. मीही हाती घेतलेले कोणतेही कार्य पूर्ण केल्याशिवाय राहात नाही. या आंदोलनास पाठींबा दिल्याबद्दल पांडुरंग भोसलें सह विविध पक्षसंघटना व जामखेड परिसरातील नागरिकांचे आभार मानले. तसेच ज्या-ज्या वेळी तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही मदतीची गरज असेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी ,नाही तर दोन पावले तुमच्या पुढे असेल, तसेच मंत्री महोदय किंवा विद्यापीठा समोर जरी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मी तुमच्यासोबत असेल असेही आश्वासन आ. लंके यांनी विद्यार्थी व पांडुरंग भोसले यांना दिले.

आमदार रोहीत पवार यांनीही दुरध्वनी वरून झालेल्या सर्व कारवाई व कार्यवाही याबाबत माहिती दिली व अंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आज रोजी ११ व्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तहसीलदार गणेश माळी, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, आरपीआयचे सुनिल साळवे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, राजेंद्र कोठारी, राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, रमेश आजबे, केदार रसाळ, शहाजी राळेभात, पवन राळेभात, हवा सरनोबत, प्रशांत राळेभात,सनी सदाफुले , सचिन देशमुख, डॉ भरत दारकूंडे,विजय राळेभात, जगन्नाथ म्हेत्रे,भाऊ पोटफोडे, गणेश जोशी, नाना पवार,आकाश गागरे ,शुभम हजारे,आदी मान्यवरांसह पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश माळी ( तहसीलदार, जामखेड)

आपल्या बहुसंख्य मागण्या विद्यापीठ स्तरावर अहवालाच्या अनुषंगाने विद्यार्थीच्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्यामुळे आपण आंदोलन व उपोषण मागे घ्यावे जेणे करून आपणास परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन संदर्भात अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करावा.

पांडुरंग भोसले

गेल्या १० दिवसात पासून सुरू असलेले रत्नदीप विरोधातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या बाबत आंदोलन सुरू होते या मागण्या पैकी काही मागण्या मान्य झाल्या असून काही मागण्या प्रलंबित आहेत त्या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर पुन्हा आंदोलन करणार


Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRTE Admission 2024-25 प्रवेश सुरू; पूर्ण शिक्षण मोफत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Next Article Nilesh lanke| आमदार निलेश लंकेची लोकप्रियता वाढली ;जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार स्वागत
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.