Rohit Pawar यांनी धनंजय मुंडेंना दूर केलं.?
राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. रोहित पवार Rohit Pawar यांच्या आरोपांना आता भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Table of Contents

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमादर रोहित पवार Rohit Pawar यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपनंच पक्ष फोडल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
भाजपचं मुंडे कुटुंब देखील याच लोकांनी फोडलं होतना? धनंजय मुंडे यांना दूर करणारे तुम्हीच होताना असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शरद पवार यांची येवल्यात सभा झाली. याच दरम्यान त्यांचा एक पावसात भिजल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पावसात आम्हीही भिजतो. साहेबांचं वय झालं आहे, आजारपण आहे, त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते. आम्ही सुद्धा शिवसेनेत असताना पहाटेपर्यंत काम करायचो. मागच्या निवडणुकीत सुद्धा प्रचंड पावसात आम्ही बैठका घेतल्या. हा काही नवीन भाग नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलतांना छगन भुजबळ यांनी कोण रोहित पवार मी कोणालाही किंमत देत नाही, मी सामन्य कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी आलो नव्हतो, मी शिवसेनाच आमदार, मुबंईचा महापौर अशा पदाचा या अनुभव घेऊन आलतो, रोहित पवारांचा Rohit pawar जन्म झाला, नसेल तेव्हा पासून राजकारणात आहे, त्यांनी बोलतांना तारतम्य बाळगावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले