जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार
आज रोजी जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.खड्ड्यामुळे होणारे नेहमीचे अपघात तसेच राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम मंजूर असूनही शहरातील खड्डे अजूनही बुजवण्यात आले नव्हते तसेच काही बिड रोड काॅर्नर येथे सुध्दा मोठा खड्डा होता , सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रहदारीस व नागरिकांना अडचणी येत आहेत.

याच अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते वैजिनाथ पोले यांच्या सह अशोक शेठ शिंगवी यांनी कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या सोबत फोन वरून तसेच समक्ष भेटून शहरातील खड्डे संदर्भात चर्चा केली असे यावेळी महालोकवाणी न्यूज शी बोलताना सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी त्वरित दखल घेत यांच्या जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले सध्या तरी हा प्रश्न सुटला आहे.याबद्दल जामखेड शहरातील नागरिकांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.
