Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar | कर्जत जामखेडचे बस स्थानक होणार सुसज्ज; आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधींचा निधी मंजूर

Rohit Pawar | कर्जत जामखेडचे बस स्थानक होणार सुसज्ज; आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधींचा निधी मंजूर

mahalokwaniBy mahalokwaniDecember 23, 2023Updated:December 23, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत/ जामखेड | कर्जत जामखेड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बस स्थानकाचे कॉंक्रीटीकरण करणे तसेच सुलभ शौचालय बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे आता कर्जत-जामखेड मधील आगार सुंदर आणि सुसज्ज होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, कामगार यांची गैरसोय टाळण्यासाठी जास्तीच्या बसेस दोन्हीही तालुक्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्यावतीने करण्यात आली होती, त्याही बसेस आता लवकरच उपलब्ध होणार आहेत.

Smart watch। स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंगसह 999 रुपयांमध्ये, बॅटरी देखील चालेल 5 दिवस !

Rohit Pawar आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधींचा निधी मंजूर..

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि औद्योगिक महामंडळ (MIDC) यांच्यात नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान 600 कोटी रुपयांचा करार झाला आहे. त्यातूनच मिरजगाव येथील बसस्थानकासाठी 1 कोटी 90 लक्ष तसेच कर्जत येथील बसस्थानकासाठी 1 कोटी 36 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर जामखेड येथील बसस्थानकासाठी 4 कोटी 36 लक्ष रुपये आणि खर्डा कोल्हार बसस्थानकासाठी 1 कोटी 9 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. कर्जत येथील बस स्थानकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी परिवहन महामंडळाला पत्र दिले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना सरकार बदलल्यानंतर स्थगिती लावली होती. परंतु न्यायालयाने ही स्थगिती उठवली आणि कामे पूर्ववत झाली.

आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ‘कर्जत जामखेड’साठी जास्तीच्या 30 बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाचे सचिव यांना तपासून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे परिवहन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार लवकरच नवीन 2000 बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. त्या आल्यानंतर कर्जत जामखेड jamkhed साठी बसेस उपलब्ध करून दिल्या जातील असे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

Table of Contents

  • Rohit Pawar आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधींचा निधी मंजूर..

यापूर्वी जामखेड येथे बस स्थानक पुनर्बांधनी व व्यापारी गाळे बांधकामासाठी पाच कोटींचा निधी आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणला होता. तसेच कर्जत येथील २५ वर्षांपासून प्रलंबित असणारा डेपोचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला होता त्याचे काम देखील आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच कर्जत, मिरजगाव व खर्डा येथे धुळीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतु आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करून बस स्थानकासाठी महत्त्वाचा असणारा काँक्रिटकरणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता नवीन बस प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करत आहेत. यासोबतच बस डेपो चे काम पूर्ण झाल्यानंतर तेथील कामगार व डेपोचे नियोजन करावे लागते त्यासाठी देखील आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा शासन दरबारी सुरू आहे.

प्रतिक्रिया- आमदार Rohit Pawar रोहित पवार

सरकार कोणतेही असो मतदारसंघातील लोकांसाठी माझा पाठपुरावा हा कायम असाच सुरू राहणार तसेच माझ्या मतदारसंघातील जनतेला दिलेले बहुतांश शब्द मी जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करू शकलो, याचा आनंद आहे. आता राहिला प्रश्न तो एमआयडीसीचा तोही मी लवकरच मार्गी लावणार.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेड तालुका गणित आणि विज्ञान प्रदर्शन संपन्न; अंधश्रद्धा न बाळगता विज्ञानाची कास धरावी – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
Next Article jamkhed| जामखेड च्या वैभवात व आरोग्यात डॉ.आरोळे दांम्पत्याचा सिंहाचा वाटा – प्राध्यापक मधुकर राळेभात
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.