मुलींनी तक्रार केलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर कारवाई होणारच. विद्यार्थांच्या शैक्षणिक जीवनाचा प्रश्न आहे कोणीही राजकारण आणु नये. मी तुमचा मोठा भाऊ म्हणून आज आणि पुढेही तुमच्या बरोबर न्यायासाठी लढायला उभा आहे. तुमचे कॉलेज ट्रान्सफर करण्याचा पुर्ण प्रयत्न करू. jamkhed जामखेड- कर्जतचे नागरिक चांगले आहेत म्हणूनच बाहेरगावच्या मूलमूलींच्या पाठीशी एकजूटीने उभे आहेत. असे सांगून आमदार
रोहित पवार Rohit Pawar यांनी विद्यार्थ्यांना अश्वासन दिले.
old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

Table of Contents
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात गेल्या सात दिवसांपासून तहसील कार्यालय समोर विद्यार्थी व विद्यार्थिनी आंदोलन करीत आहेत.आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी या आंदोलनाची दखल घेत दि.११ मार्च रोजी सायंकाळी उशिरापर्यंत या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या शी विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी पुणे विद्यापीठाचे उपकुल सचिव प्रदीप कोळी, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी हर्षदीप जोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याशी सखोल चर्चा केली, आणि मोरे याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली
Rohit Pawar विद्यार्थ्यांनीनी आमदार रोहित पवारांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
आम्ही मागिलवेळी पाच मुलींनी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिले मात्र पोलिसांना दिलेले तक्रारी अर्ज पोलिसांकडून डॉ भास्कर मोरे कडे गेले. त्यातक्रारी अर्जावरून त्याने कॉलेजच्या मुलींना खुप टाॅर्चेर केले. जिथे पोलिसाकडुनच सुरक्षिततेच्या बाबी संभाळल्या जात नाहीत. तिथे आम्ही मुली कशा थांबणार. आम्हाला हे मेडिकल कॉलेज सुरक्षित वाटत नाही. कॉलेजमध्ये कसलाही आभ्यासक्रम शिकवला जात नाही. कॉलेज तपासणीसाठी विद्यापिठाची समिती आल्यावर आम्हांला रुग्ण बनवुन सलाईन लावले जाते, मग न शिकवता डिग्री अशीही भेटणार आहे. फक्त पैसे भरा व मोकळे व्हा असे भास्कर मोरे मूलींना सांगतो. अन् सांगितले ते नाही केले तर ,असं सांगतांना अक्षरश मूलींना रडू कोसळले. त्यामुळे उपस्थितांचेही डोळे पानावले.
Rohit Pawar रोहित पवारांनी केली हि मागणी
डॉ भास्कर मोरे यांचेकडील पिस्तूल चा परवाना रद्द करण्यात येईल.रत्नदीप मेडीकल कॉलेज सिल करून विद्यार्थ्यांची कागदपत्रे ताब्यात घेण्याच्या सूचना आ.रोहित पवार Rohit Pawar यांनी पोलीसांना केल्या. तसेच एकाही विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबादारी घेऊ
आमदार रोहित पवार यांनी उपोषण स्थळी घेतल्या पाच बैठका
यावेली संभाजी ब्रिगेड चे आण्णासाहेब सावंत, शिवप्रतिष्ठान चे पांडुरंग भोसले, सुर्यकांत मोरे,हवा सरनोबत,मनसे तालुका प्रमुख प्रदीप टापरे,सनी सदाफुले, केदार रसाळ, नगरसेवक मोहन पवार, प्राचार्य विकी घायतडक, कुंडल राळेभात,रमेश आजबे, प्रशांत राळेभात, महेंद्र राळेभात,महेश राळेभात,काकासाहेब कोल्हे, बापूसाहेब कार्ले, युवा नेते प्रवीण उगले, सचिन मोकाशे , सागर सदाफुले महेश यादव हरिभाऊ आजबे, गणेश हगवणे,विनय डूकरे, सचिन गायकवाड, आकाश गागरे यांच्या सह राष्ट्रवादी चे कार्यकर्ते व विद्यापीठ कमिटी चे सदस्य, महसूल, पोलीस, वनविभाग, आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी,विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेकडो आंदोलक,धारकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
