Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यात आणि देशात सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर केला जातोय तसेच हा भारतीय जनता पक्षाकडून (BJP) व्यवस्थेचा होणारा गैरवापर टाळायचा असेल तर सोशल मीडिया हाच पर्याय असल्याचं सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला ठोकून काढा, असं ते म्हणाले.
BJP। नगरमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार; या दिवशी होणार पक्ष प्रवेश.!
शरद पवार (Sharad Pawar )काय म्हणाले?
“कांदा उत्पादकाच्या संसारात हात घालण्याच काम आज केंद्र सरकारने केलं आहे. कांदा निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडलेत. कांद्यावर शुल्कवाढ केल्याने शेतकऱ्यांसाठी जगातलं मार्केट बंद झालं.”, अशा शब्दात शरद पवार यांनी शुल्कवाढीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमाला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची उपस्थितीही होती.
या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी (Sharad Pawar )देशात सुरु असेलेल्या धार्मिक वादाच्या मुद्द्याला हात घातला. हे टाळण्यासाठी लोकांनी जागरुक राहिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “आम्हाला देशामध्ये धार्मिक युद्दध लकोत, आम्हाला दंगली नकोत, आम्ही शांततेचे पुजारी आहोत. आम्ही लोकांच्या समतेचा आग्रह करणारे आहोत. जर सरकारी यंत्रणा असं करत असेल, ते आम्हाला मंजूर नाही.”

Sharad Pawar यांचा अजित पवार गटावर निशाणा
“अलीकडे आपल्यातील काही लोकं पक्षाबाहेर गेले आहेत. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो असं त्यांच्याकडून सांगितले जातं, मात्र त्यात काही अर्थ नाही. मात्र काही लोकांमध्ये ईडी लागली होती, त्यामुळे आपले लोक तिकडे गेलेत. अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये गेले होते, मात्र त्यांनी सांगितले. मी काही केलं नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही. पक्षांतर केलं म्हणजे काय केलं, भाजपच्या दावणीला जाऊन बसलेत. आज भाजप जे सांगेल ते त्यांना करावं लागत आहे. आमच्या बाजूने या अन्यथा आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवू. दुसऱ्या जागेची भीती म्हणून आपल्या सहकारी भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत”, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. तसेच भाजपलाही सुनावलं.
