जामखेड तालुक्यातील शिऊर गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापण व एल ई डी दिवे या कामाची चौकशी अहवाल गट विकास अधिकारी जामखेड यांनी दि. १५/०९/२०२३ रोजी दिलेला पूर्ण चुकीचा असून तो आम्हाला मान्य नाहीत्या अहवाला बाबत आपण स्वत: चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करावी.या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना शिवसेना दलित आघाडी चे जामखेड तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी दिले होते.
मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी पांडुरंग समुद्र यांनी उपोषण सुरू केले, यावेळी त्यांनी संबधीत कामाची पोलखोल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविले,सोबत झालेल्या कामाचे पुरावे पण दाखविले.
समुद्र यांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी मा.येरेकर साहेब यांनी देखील या उपोषण च्या संदर्भात तात्काळ बैठक घेतली आणि सूचना दिल्या

नेमके हे प्रकरण आहे तरी काय आणि काय आदेश दिले आहेत जिल्हा परिषदेने हे समजावून घेऊया
याबाबत माहिती अशी की ,जामखेड पंचायत समिती चे गट विकास अधिकारी यांनी कामाच्या चौकशीसाठी दोन अधिकारी नियुक्त केले होते व दहा दिवसात अहवाल करण्यास सांगितले होते त्यांनी तो आदेश मानला नाही याचा अर्थ ते बीडीओ यांना जुमानत नाहीत.
एक अधिकारी १५ दिवसांनी आले व दुसरे २५ दिवसांनी आले व फक्त एक शोष खड्डा दाखवून फोटो काढले बाकी तुम्ही शोधा असे आम्हाला सांगून ३५ लोकांची यादी दिली सोबत येताना ज्या ठेकेदाराने काम केले त्याला सोबत आणले, गावातील सरपंच व ठेकेदार एकाच कुटुंबातील आहेत हे चौकशी अधिकारी व बीडीओ यांना माहित आहे. एल ई डी दिवे एका वस्ती वर जाऊन तीन -चार फोटो काढले व ग्रामपंचायत मध्ये येऊन बसले कुठल्याही कागद पत्राची शाहनिशा केली नाही
आम्ही तसे विचारले असता ठेकेदार म्हणाला तुम्ही कुठेही जा माझे कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळे या निवेदनाद्वारे आम्ही आपणाकडे न्याय मागत आहोत सन २०२०-२०२१-१५ वा वित्त आयोग आराखडा दि.०१/०८/२०२१ चा आदेश आराखड्यामध्ये नसतानाआदेश करून ठराव व तारखा हेड नसताना बोगस बील दाखवून फक्त पैसे काढून घेतले. सरपंच व ग्रामसेवक यांनी उपहार केला हि गोष्ट बीडीओ साहेब यांच्या लक्षात आली नाही घनकचऱ्या मधील ३३% रक्कम ग्रामपंचायतने कुठलाही ठराव न घेता खर्च केले कसे याचीही बीडीओ साहेबांनी चौकशी केली नाही.

दि.२०/०८/२०२१ रोजी जे बील काढले जे साहित्य खरेदी केले त्या बीलावर कुठल्याही तारखा नाहीत, ठरावावर तारीख नाही सुचक, अनुमोदक नाही गावतील सरपंच, ठेकेदार यांचे बीडीओ साहेबांशी चांगले हित संबंध आहेत तसेच पंचायत समिती मधील अधिकारी चांगले मित्र आहेत तरी या सर्व प्रकरणाची आपण स्वताहा चौकशी करावी व जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर दहा दिवसात कार्यवाही करावी
आत्ता या सर्व झालेल्या कामाची चौकशी अहमदनगर जिल्ह्यातील अन्य कोणत्याही पंचायत समितीच्या बीडीओ मार्फत या सर्व कामाची चौकशी करण्यात येणार आहे तसे पत्र मा. समर्थ शेवाळे प्रकल्प अधिकारी अहमदनगर जिल्हा परिषद यांनी दिले आहे व लवकरच कामाची पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
या आश्वासन नंतर समुद्र यांनी उपोषण माघे घेतले आहे
