Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Stock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार, गुंतवणूकदारांना इतक्या लाख कोटींचा फटका

Stock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार, गुंतवणूकदारांना इतक्या लाख कोटींचा फटका

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज ब्लॅक फ्राईडेने (Black Friday) गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुट्टी होती. त्यानंतर आज शुक्रवारी, 27 जानेवारी 2023 रोजी बाजाराचा मूड अचानक स्वींग झाला. अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरु झाल्याने बाजाराचा मूड बिघडला. बाजारात भीतीने आक्रमण केले आणि धडाधड विक्री सत्र सुरु झाले. भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफ्याची चक्री फिरवली. त्यामुळे निर्देशांक 60,000 अंकाहून खाली आला. एकावेळी तर सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला. शेअर बाजार बंद झाल्यावर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 1.45 टक्के, 874 अंकांच्या घसरणीसह 5930 अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीत (Nifty) 400 अंकांची घसरण झाली. निफ्टी 287 अंकांच्या घसरणीसह 17,604 अंकावर बंद झाला.

‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !

बाजारातील या पडझडीचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला. बीएसईवर सुचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप घसरुन 269.74 लाख कोटी रुपयांवर आले. बुधवारी कंपन्यांचे एकूण भांडवल 276.69 लाख कोटी रुपये होते. म्हणजे आजच्या सत्रात कंपन्यांचे 6. 95 लाखांचे नुकसान झाले. तर दोन व्यापारी सत्रात गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचा फटका बसला.

आजच्या व्यापारी सत्रात टाटा मोटर्सचा शेअर 6.34 टक्के, आयटीसी 1.77 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.71 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.51 टक्के, एनटीपीसी 0.21 टक्के, सन फार्मा 0.08 टक्क्यांसह बंद झाला. तर ब्लॅक फ्रायडेच्या लाटेत इतर दिग्गजांनाही फटका बसला. एसबीआय 5.01 टक्के, आयसीआयसीआय बँक 4.41 टक्के, इंडसइंड बँक 3.43 टक्के, अॅक्सिस बँकेत 2.07 टक्के, कोटक महिंद्रामध्ये 2.03 टक्के, टेक महिंद्रा 1.97 टक्क्यांची घसरण झाली.

आजच्या व्यापारी सत्रात अनेक सेक्टरला फटका बसला तर या पडझडीत काही क्षेत्रांनी कमाल कामगिरी केली. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात दिग्गज कंपन्या झोपल्या तर काहींनी गुंतवणूकदारांचा फायदा केला. बँकिंग सेक्टर, आयटी, पीएसयू बँक, आर्थिक सेवा, मेटल्स, मीडिया, ऊर्जा, इन्फ्रा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरच्या शेअरमध्ये घसरण झाली.

तर ऑटो, फार्मा, एफएमसीजी आणि हेल्थकेअर सेक्टरमधील स्टॉक्समध्ये मोठी तेजी दिसून आली. निफ्टीतील 50 शेअरमधील 13 शेअर तेजीसह बंद झाले. 37 शेअरमध्ये पडझड झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअरमध्ये तेजी तर 22 शेअरमध्ये घसरण झाली. 25 जानेवारी 2023 शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये जवळपास 773.69 अंकांची घसरण झाली होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 60205.06 अंकावर बंद झाला होता. तर 226.30 अंकांची घसरण होऊन निफ्टी 17892.00 अंकावर बंद झाला होता. बीएसईमध्ये एकूण 3,646 कंपन्या ट्रेडिंग करतात. त्यातील जवळपास 1,136 कंपन्यांचे शेअर तेजीत होते. तर 2,378 शेअर घसरणीसह बंद झाले होते. तर 132 कंपन्यांच्या शेअरमध्ये कोणताही फरक पडला नव्हता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !
Next Article ‘प्रकाश आंबेडकरांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत’, आमदार रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.