ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी टाटा मोटर्सने आता त्यांचे एसयूव्ही मॉडेल्स अपडेट केले आहे. टाटाने या अपडेटसाठी Amazon सोबत हातमिळवणी केली आहे, तुम्हाला या भागीदारीचा थेट फायदा मिळेल, कारण Nexon, Harrier, Nexon EV आणि Safari सारखे मॉडेल Tata Motors अपडेट केले गेले आहेत.

Tata Motors या मॉडेलला मिळाला अॅलेक्सा सपोर्ट
या नवीन अपडेटसह, आता टाटा मोटर्सच्या या एसयूव्ही मॉडेल्स चालवणाऱ्यांना कारमध्येच अॅलेक्सा व्हॉईस कमांड सपोर्टचा लाभ मिळेल. या वाहनांमध्ये अंगभूत अॅलेक्सा सपोर्ट दिला जाईल.

अॅलेक्सा सपोर्ट मिळाल्यानंतर, आता तुम्ही फक्त बोलून वाहनातील तापमान बदलू शकता, एअरफ्लो सेटिंग समायोजित करू शकता, स्क्रीनची चमक समायोजित करू शकता, सनरूफ उघडू आणि बंद करू शकता आणि इतर अनेक गोष्टी. या वैशिष्ट्याची ओळख झाल्यानंतर , तुम्ही आता फक्त बोलूनच कारमध्ये हे करू शकाल. एवढेच नाही, तर तुम्ही व्हॉईस कमांडद्वारे 360 डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा देखील सहज नियंत्रित करू शकता.
Pune Dargs| पुणे ड्रॅग्स प्रकरणाचा मास्टरमाइंट ललित पाटील नव्हे; हा आहे मुख्य आरोपी..
टाटा नेक्सॉन, सर्वाधिक विक्री होणारी सब-कॉम्पॅक्ट SUV ची सुरुवातीची किंमत 8 लाख 10 हजार रुपये आहे, तर Nexon EV ची किंमत 14 लाख 74 हजार रुपयांपासून सुरू होते.

तर, 2023 Tata Harrier आणि 2023 Tata Safari च्या किंमती 15 लाख 49 हजार रुपये आणि 16 लाख 19 हजार रुपयांपासून सुरू होतात. सर्व मॉडेल्सच्या किंमती एक्स-शोरूम किंमती आहेत. आत्तापर्यंत, Tata Cars टाटा मोटर्सने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही की कंपनी हे फीचर आपल्या इतर मॉडेलमध्ये देखील जोडेल की नाही.
