विराट कोहली Virat Kohli याने सचिन तेंडुलकर याच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियममध्ये इतिहास रचला. विराटने सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड उध्वस्त केला. यानंतर विराट सचिनसमोर नतमस्तक झाला.
Virat Kohli विराट कोहली दमदार शतकी खेळी

न्यूझीलंड विरुद्ध विराट कोहली Virat Kohli याने वनडे करियरमधील 50 वं शतकं झळकावलं. विराटने यासह सचिन तेंडुलकर याला मागे टाकलं. सचिनने वनडेमध्ये 49 शतकं केली होती. विराट शतक ठोकल्यानंतर भावूक झाला.
विराटकोहली गुडघ्याच्या आधारावर बसला आणि हेल्मेट काढला. विराट त्यानंतर सचिनसमोर नतमस्तक झाला. त्यानंतर सचिनही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होता. सचिनने आपल्या डोळ्यांनी आपला वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होताना पाहिला. सचिनने टाळी वाजवून विराटचं शतकासाठी अभिनंदन केलं. सचिनने स्टँडिंग ओवेशन दिल्याने विराट भावूक झाला. तसेच अनुष्का शर्मा हीने विराटला फ्लाईंग किस दिली.
Table of Contents
विराटने न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार बॅटिंग केली. कॅप्टन रोहित शर्मा याने तडाखेदार सुरुवात करुन दिली. विराटने शतकादरम्यान झंझावाती खेळी केली. मात्र अखेरच्या टप्प्यात विराटने संथ खेळी केली. मात्र विराटने सिंगल डबल रन्स घेत शतक पूर्ण केलं. विराटने 113 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 117 धावा केल्या.

झीलंडसमोर 398 धावांचं आव्हान
दरम्यान विराट कोहलीशिवाय टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर यानेही शतक केलं. श्रेयस अय्यर याने 105 धावांची शतकी खेळी केली. श्रेयसने 70 बॉलमध्ये 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. कॅप्टन रोहित शर्मा याने 47 रन्सचं योगदान दिलं. रोहितने 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने या 47 रन्स केल्या. शुबमन गिल याने 66 चेंडूत 80 धावांचं योगदान दिलं. केएल राहुल 39 धावांवर नाबाद परतला. तर सूर्यकुमार यादव याने 1 रन करुन आऊट झाला. न्यूझीलंकडून टीम साऊथी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट याने 1 विकेट घेतली.Virat Kohli Virat Kohli bowed before Sachin Tendulkar after a century