Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Water| जामखेडवर जलसंकट; तहसील कार्यालयावर महिलांचा आक्रोश करत हंडा मोर्चा

Water| जामखेडवर जलसंकट; तहसील कार्यालयावर महिलांचा आक्रोश करत हंडा मोर्चा

mahalokwaniBy mahalokwaniMarch 27, 2024Updated:March 27, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी water मिळत नसल्याने आज बुधवार दि २७ मार्च शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन जामखेड तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. या संतप्त महिलांनी तहसील कार्यालयात घुसून हांडे वाजून घोषणा देऊन संताप व्यक्त केला.

Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप

Water| जामखेडवर जलसंकट

यावेळी आंदोलन करत्या महिलांनी जामखेड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,जामखेड तालुक्यात भीषण पाणी water टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कर्जत/ जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागत होता. परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचे कारण सांगत प्रशासनाकडून सध्या हे टँकर बंद करण्यात आले आहेत.

त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत असून विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा‌ प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडं अद्यापही शासकीय टँकर सुरू झालेले नाहीत. मागील पाच वर्षांपासून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत लोकांच्या मागणीनुसार
पाणीपुरवठा केला गेला. परंतु सध्या प्रशासनाकडून हे टँकर बंद करण्यात आल्याने लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. टँकर पुन्हा सुरु न झाल्यास लोकांमधील संतापाची तीव्रता अधिक वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे.

त्यामुळे शासनास सहाय्यभूत ठरणाऱ्या ‘कर्जत-जामखेड Jamkhed एकात्मिक विकास संस्थे’च्या माधयमातून टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करणे आणि शासकीय टँकरही सुरु करुन लोकांच्या मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा विशिष्ट लोकांच्या राजकारणासाठी प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या राजकीय दबावाला बळी‌ पडून नागरिकांच्या हितासोबत असा खेळ खेळणं योग्य नाही. असेही निवेदनात म्हटले आहे. तहसील कार्यालयात जाऊन महिलांनी रिकामे हांडे वाजून आक्रोश निर्माण केला यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला.दोन्ही आमदारांनी राजकारण न करता पाण्याचे टँकर सुरू करावे अशी मागणी यावेळी महिलांनी केली. ” पाण्याचा टँकर चालू झालाच पाहिजे,पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं,कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा यावेळी महिलांनी दिल्या. तुम्ही नेते मंडळी बिसलरी चे पाणी पिता व आम्हाला घरात प्यायला पाणी नाही,आंघोळीला पाणी नाही याचा विचार केला पाहिजे असेही संतप्त महिलांनी यावेळी ठणकावले. रमजानचा सण सुरू असताना आम्हाला घरात प्यायला व आंघोळीला पाणी नाही आमची सरकारने सोय करावी अशा प्रतिक्रिया मुस्लिम महिलांनी यावेळी दिल्या.


यावेळी विजयसिंह गोलेकर, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले,दत्तात्रय वारे, माजी सभापती राजश्री मोरे,राजेंद्र पवार , प्रकाश सदाफुले, सुधीर राळेभात, शहाजी राळेभात,राजेंद्र गोरे, मोहन पवार दिपक पाटील,प्रकाश काळे,महारुळी सरपंच अंजली ढेपे,नरेंद्र जाधव, संचालक दत्तात्रय सोले पाटील, संतोष निगुडे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे, अनुराधा अडाले,प्रदीप शेटे, प्रशांत राळेभात, कुंडल राळेभात, वसीम सय्यद, युवा नेते महेंद्र राळेभात,सरपंच बाळासाहेब खैरे, संदीप राळेभात,प्रवीण उगले, काकासाहेब कोल्हे, गणेश म्हस्के,बापूसाहेब कार्ले, निलेश पवार, काकासाहेब चव्हाण,हरिभाऊ आजबे, रामहरी गोपाळघरे,डॉ.नरसाळे

Table of Contents

  • Water| जामखेडवर जलसंकट

अनिल बाबर,संजय डोके, श्रीकांत लोखंडे, चांँद तांबोळी, अमर चाऊस,महेश यादव, किरण कोल्हे, दत्ता डिसले, अनिल रेडे, सचिन शिंदे, अशोक पठाडे,महालिंग कोरे, युवराज उगले,सचिन डोंगरे, आकाश गागरे,अक्षय खिळे,अशोक गिते व आमदार रोहित पवार यांचे स्विय सहाय्यक सचिन मोकाशे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNagar| नगर जिल्ह्यात खळबळ जनक घटना; मुलींना जिवंत जाळणारा अखेर ताब्यात
Next Article BJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.