टीम इंडियाने india न्यूझीलंडचा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 70 धावांनी धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे.
टीम इंडियासाठी हे ठरले खरे हिरो
सेमी फायनलमध्ये semi final न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मोहम्मद शमी याने सर्वाधिक 7 विकेट्स घेत न्यूझीलंडचं 48.5 ओव्हरमध्ये 327 धावांवर पॅकअप केलं. विराट कोहली , श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी ही तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.
Virat Kohli विराट कोहली शतकानंतर सचिनसमोर झाला नतमस्तक; यामुळे कोहली भावुक

World Cup 23 Final Match
वर्ल्डकप २३ ची फायनल मॅच World Cup 23 Final Match रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी १२ वाजल्यापासून अहमदाबाद येथे सुरु होणार आहे, त्या आधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमी फायनल होणार आहे, या सामन्यात जो संघ विजयी होईल , त्यांच्या बरोबर भारताची फायनल मॅच होणार आहे
तसेच टीम इंडियाची ही वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची चौथी वेळ ठरली. तसेच टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमधील पराभवाचा वचपा घेतला.
न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 134 धावांची खेळी केली. कॅप्टन केन विलियमसन याने 69 धावांचं योगदान दिलं. ग्लेन फिलिप्स 41 धावांवर आऊट झाला. सलामी जोडी डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. टॉम लॅथमन याला भोपळाही फोडू दिला नाही. मिचेल सँटरने आणि टीम साऊथी या दोघांनी प्रत्येकी 9 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 47 धावा केल्या. शुबमन गिल याने नाबाद 80 धावा केल्या. शुबमनला क्रॅममुळे मैदान सोडावं लागलं. त्यानंतर शुबमन गिल शेवटच्या काही षटकांसाठी मैदानात आला आणि त्याने काही धावा जोडल्या. विराट कोहली याने 113 बॉलमध्ये 117 धावा केल्या. मुंबईकर लोकल बॉय श्रेयस अय्यर याने 105 धावांची शतकी खेळी केली. विकेटकीपर केएल राहुलने 39 धावांची नाबाद खेळी केली. तर सूर्यकुमार यादव 1 रनवर आऊट झाला. न्यूझीलंडकडून टीम साऊथी याने 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट याच्या खात्यात 1 विकेट गेली.
Table of Contents
दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा फायनलमध्ये final पोहचली आहे. त्याआधी टीम इंडिया 2011, 2003 आणि 1983 साली फायनलमध्ये पोहचली होती.
