Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Worldcup2023| पाच वेळा चॅम्पियन बनलेला संघ पहिल्यांदाच गुणतालिकेच्या तळाशी; ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय चुकतंय ?

Worldcup2023| पाच वेळा चॅम्पियन बनलेला संघ पहिल्यांदाच गुणतालिकेच्या तळाशी; ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय चुकतंय ?

mahalokwaniBy mahalokwaniOctober 16, 2023Updated:October 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भारतामध्ये वर्ल्डकपचा Worldcup2023 महासंग्राम आता शिगेला पोहचला आहे. वर्ल्डकपमध्ये मोठे उलटफेर होताना दिसत आहे. गतविजेत्या इंग्लंडची अफगाणी फिरकीने पार पळता भुई करून सोडली, अशातच पाच वेळा विजेतेपद मिळवणारी ऑस्ट्रेलिया मात्र यंदा गुणतालिकेच्या तळाशी गेलीय.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मात्र सूर अजून गवसला नाही गोलंदाजांकडून सुद्धा म्हणावा तशी कामगिरी होताना दिसत नाही. दरम्यान ऑस्ट्रेलियाची पुढचा सामना श्रीलंकेसोबत लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेऊयात…

वर्ल्डकप विजेतेपदाची दावेदार असणारी ऑस्ट्रेलिया यंदा संघर्ष करतेय, त्याला कारणीभूत भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांना न गवसलेला सूरच म्हणता येईल. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाठलाग केला, दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकूनही 200 धावा करण्यात त्यांना अपयश आले. ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने हार पत्करल्या आहेत त्या त्यांच्या संघ व्यवस्थापनासाठी चिंतेची बाबच म्हणावी लागेल.

डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नास लाबूशेन यांना वगळता त्यांच्या फलंदाजीच्या प्रदर्शनात आक्रमकतेचा अभाव दिसत आहे , कारण इतर कोणताही खेळाडू 30 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. त्यामुळेच दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना 200 चा आकडा पार करता आला नाही.

ऑस्ट्रेलियाला भारतातील विश्वचषक स्पर्धेतील परिस्थितीशी जुळवून घेत आहेत, असे कर्णधार पॅट कमिन्सने रविवारी लखनौ येथील पत्रकार परिषेदेत सांगितले पाच वेळा चॅम्पियन या Worldcup2023 स्पर्धेतील पहिला विजय शोधत आहेत. कमिन्स म्हणाला भारतीय खेळपट्ट्या जश्या दिसतात तश्या त्या खेळत नाहीत, त्या सपाट असतानाही स्पिंनर्सला मदत करतात. त्यामुळेच त्या समजायला आम्हाला आतापर्यंत कठीण गेलं आहे. पण आम्ही पुढच्या सामन्यामध्ये खेळपट्ट्याशी जुळवून घेऊन सकारात्मक निकाल आणू,अशी अपेक्षा आहे

ऑस्ट्रेलियन संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने पाच एकदिवसीय विश्वचषक, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी, एक टी-२० विश्वचषक तसेच एक जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुद्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने पाच एकदिवसीय विश्वचषक (1987, 1999, 2003, 2007, 2015) जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीवरही कब्जा केला आहे. 2006 आणि 2009 मध्ये संघ चॅम्पियन झाला होता. यानंतर 2021 मध्ये T20 विश्वचषक जिंकला आणि 2023 मध्ये कसोटी चॅम्पियनशिप जिंकली.

दरम्यान आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया चमकदार कामगिरी करून जोरदार असं कमबॅक करणार का ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार. संग्राम जगताप यांच्या मनात चालले तरी काय ? वाचा काय घडले असे..?
Next Article नगर- मधील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पुजारी यांच्या घरी पलंगाचे भव्य स्वागत
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.